मराठी बातम्या /बातम्या /देश /

खळबळजनक! कोरोना, ब्लॅक-व्हाईट-येलो फंगसशी लढता लढता Toxemia ने घेतला रुग्णाचा जीव

खळबळजनक! कोरोना, ब्लॅक-व्हाईट-येलो फंगसशी लढता लढता Toxemia ने घेतला रुग्णाचा जीव

Corona नंतर या आजाराची वाढली भिती

Corona नंतर या आजाराची वाढली भिती

येलो फंगस झालेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला (Yellow fungus covid patient dies)आहे.

  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 29 मे :  कोरोनासारखा (Coronavirus) भयंकर आजार, त्यात ब्लॅक, नंतर व्हाईट आणि मग येलो फंगसनंही (Black, white and yellow fungus) गाठलं.  या चार चार आजारांशी एकत्रित लढा देत असताना त्याची जीवनमृत्यूशी झुंज अपयशी ठरली (Yellow fungus covid patient dies) आहे. या आजारांवर उपचार घेत असताना टॉक्सेमियामुळे (Toxemia) त्यांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील (Ghaziabad) 59 वर्षांचे कुंवर सिंह. ज्यांना काही दिवसांपूर्वीच येलो फंगस झाला होता. त्यांचा आता मृत्यू झाला आहे. कुंवर सिंह यांना कोरोनानंतर ब्लॅक, व्हाईट आणि येलो या तिन्ही फंगसचं इन्फेक्शन झालं होतं.

नाक-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. बी. पी. त्यागी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, "या रुग्णाला ब्लॅक, व्हाइट फंगस होतं. 24 मे रोजी एन्डोस्कोपीमध्ये त्याला येलो फंगसचंही निदान झालं. शुक्रवारी टॉक्सिमियामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. टॉक्सेमिया म्हणजे टॉक्सिनमुळे त्यांच्या रक्तात विषबाधा झाला होती"

हे वाचा - Saline Gargle : फक्त गुळण्या करा आणि तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ओळखा

येलो फंगस झालेल्या आणखी एका 59 वर्षीय व्यक्तीवर सध्या उपचार सुरू असल्यचंही त्यांनी सांगितलं. राजेश कुमार असं त्यांचं नाव असून ते मुरादनगरमधील आहेत.

राजेश यांच्या मेंदूमध्ये फंगसचं निदान झालं. त्यांचा निम्मा जबडा काढण्यात आला. त्यांनाही टॉक्समिया आहे, पण या इन्फेक्शनचं प्रमाण कुंवर सिंह यांना झालेल्या इन्फेक्शनपेक्षा कमी आहे, असंही त्यागी यांनी सांगितलं.

सामान्यपणे यलो फंगस सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळतं. पहिल्यांदाच मला हे माणसांमध्ये दिसून आलं आहे. कोणत्याही जनरलमध्ये याबाबत काही माहिती नाही. हा संसर्ग Amphotericin B ने बरा होऊ शकतो, पण व्हाइट आणि ब्लॅक फंगसच्या तुलनेत यलो फंगसमध्ये जखम बरी होण्यास वेळ लागतो, असंही डॉ. त्यागी यांनी याआधी सांगितलं होतं.

हे वाचा - Explainer: 'झिंक'च्या जास्त सेवनामुळं ब्लॅक फंगस वाढतोय का?

थकवा किंवा सुस्तपणा, कमी भूक किंवा भूक न लागणे, वजन कमी होणं, जखम बरी होण्यास वेळ लागणं, डोळे आत जाणं ही यलो फंगसची लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसल्याच त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांकडे जा.

First published:

Tags: Coronavirus