जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, "आम्ही केलं सावध; जगात आधीच पसरला होता कोरोना"

चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, "आम्ही केलं सावध; जगात आधीच पसरला होता कोरोना"

चीनच्या उलट्या बोंबा! म्हणे, "आम्ही केलं सावध; जगात आधीच पसरला होता कोरोना"

ज्या चीनमध्ये (china) कोरोनाव्हायरसची (coronavirus) प्रकरणं सर्वात आधी समोर आली, जिथं कोरोनाचा उद्रेक झाला त्या चीनने आता अजब दावा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीजिंग, 09 ऑक्टोबर : सर्वात आधी कोरोनाची  (Corona Virus) प्रकरणं समोर आली ती चीनमध्ये (China). वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आणि मग जगभर हा कोरोना पसरला. त्यामुळे यासाठी चीनला जबाबदार धरलं जातं आहे. मात्र चीनने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. जगभरात आधीच कोरोना पसरला होता आम्ही जगाला सावध केलं आणि आवश्यक ती पावलं उचलली  असं चीनने म्हटलं आहे. जगभरात कोरोना पसरायला चीन जबाबदार नाही. ना हा व्हायरस चीनच्या लॅबमधून आला, ना चीनच्या मीट मार्केटमधून. उलट आम्ही सर्वात आधी जगाला सावध केलं, असा अजब दावा चीनने केला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, “कोरोनाव्हायरस हा नवा व्हायरस आहे. याबाबत नवीन तथ्यं आणि अहवाल समोर येत आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे गेल्या वर्षाच्या अखेर जगभरात विविध ठिकाणी महासाथ पसरली होती. खरंतर चीनने या महासाथीबाबत सर्वात आधी माहिती दिली, हा व्हायरस ओळखला होता आणि त्याच्याबाबत संपूर्ण माहिती मिळवली” हे वाचा -  माईक पेन्स यांचे गुलाबी डोळे असू शकतं का कोविड-19 चे दुर्मिळ लक्षण? चीनने अमेरिकेनं केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना हे स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पोम्पेओ यांनी चीनमधील कम्युनिस्ट पार्टीने कोरोनाव्हायरबाबत काहीच न सांगितल्याने ही परिस्थिती गंभीर झाल्याचं म्हटलं. टोकियोत मंगळवारी झालेल्या यूएस, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या बैठकीत त्यांनी हे आरोप केले. या आरोपांना चीनने उत्तर दिलं आहे. अमेरिका सातत्याने कोरोनाव्हायरससाठी चीनला जबाबदार धरत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली. ते आता बरे झाले आहेत. मात्र यानंतर ते चीनवर संतप्त झाले आहेत. ड्रॅगनची आता खैर नाही याची मोठी किंमत चुकवावी लागेल असे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. हे वाचा -  आता कोरोना रुग्णांना दिल्या जाणार प्राण्यांच्या Antibodies; लवकरच होणार ट्रायल ट्रम्प यांनी ट्वीट करून एक व्हिडीओ संदेश जारी केला. कोरोना झाल्यानंतर जे उपचार मला मिळाले ते इथल्या जनतेला मी मोफत उपलब्ध करून देण्याबाबत सध्या योजना सुरू आहे. कोरोनाचे उपचार घेण्यासाठी आता अमेरिकेतील नागरिकांना आता पैसे मोजावे लागणार नाहीत असा संदेश ट्रम्प यांनी दिला आहे. जे झालं त्यात आपली नाही तर चीनची चूक आहे आणि याची मोठी किंमत त्याला मोजावी लागणार आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात