Home /News /coronavirus-latest-news /

वादविवादात माशीमुळे चर्चेत आलेले माईक पेन्स यांचे गुलाबी डोळे असू शकतं का कोविड-19 चे दुर्मिळ लक्षण?

वादविवादात माशीमुळे चर्चेत आलेले माईक पेन्स यांचे गुलाबी डोळे असू शकतं का कोविड-19 चे दुर्मिळ लक्षण?

बुधवारी झालेल्या उपाध्यक्षपदाच्या चर्चेत माईक पेन्स यांच्या डोक्यावर बसलेली माशीच चर्चेत नव्हती तर त्यांच्या गुलाबी डोळ्यांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

    वॉशिंग्टन, 9 ऑक्टोबर : बुधवारी झालेल्या उपाध्यक्षपदाच्या चर्चेत माईक पेन्स यांच्या डोक्यावर बसलेली माशीच चर्चेत नव्हती तर त्यांच्या गुलाबी डोळ्यांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डोळ्यांतील पांढरा भाग गुलाबी होणे किंवा बुबुळाचा खाली होणारा त्रास हा खूपच सामान्य आहे. डोळ्याचा पांढरा भाग गुलाबी होण्याचा त्रास हा बॅक्टेरिया किंवा विषाणूंमुळे होऊ शकतो.‌ म्हणूनच पेन्स यांना बोलताना पाहत असलेल्या लोकांचा असा आरोप आहे की पेन्स यांचे गुलाबी डोळे ही कोविड-19 ची लक्षणं असू शकतात. जे एक व्हायरल इन्फेक्शन आहे ज्याचा परिणाम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि व्हाईट हाऊस मधील काही लोकांवर झाला आहे असाही आरोप केला जात आहे. पेन्स यांना झालेला हा डोळ्यांचा त्रास हे कोविड-19 चं दुर्मिळ लक्षण आहे का असा प्रश्न आता सगळ्यांना पडत आहे. कोविड-19 चा आपल्या डोळ्यावर काय परिणाम होतो याबद्दल जास्त माहिती नसताना अभ्यासानुसार असे समोर आले आहे की कोविड-19 मुळे डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढच्या भागाची 1.1% जळजळ होते. कोविडची ही लक्षणं 3% लोकांमध्ये आढळून आली आहेत.‌ ऑगस्ट महिन्यात 2 JAMA नेत्ररोग तंत्रज्ञांनी चीनच्या वुहानमधील रूग्णालयात दाखल झालेल्या काही रूग्णांच्या लक्षणांचा अभ्यास केला. तेव्हा त्यातल्या एका रुग्णाला काहीप्रमाणात ही लक्षणे दिसून आली. नेत्ररोग शास्राच्या ब्रिटिश जर्नलमध्ये मांडतलेल्या अभ्यासानुसार कोविड-19 झालेल्या रुग्णांच्या आजाराच्या मधल्या टप्प्यात त्यांना ही लक्षणे दिसून आली. खोकला, सर्दी आणि तापासारखी लक्षणं पेन्स यांना जाणवलेली नव्हती. पण त्यांचे डोळे गुलाबी होणं हे जर साधं नसेल तर हा कोविड-19 असू शकतो. पेन्स आणि कमला हॅरिस यांच्या चर्चेवेळी त्यांच्यामध्ये  प्लेक्झिग्लास होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हे व्हायरस थांबवण्यासाठी पुरेसे नाही. या चर्चेपूर्वी त्या दोघांपैकी कोणाचीच कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली नव्हती. परंतु त्यांच्या शेवटच्या चाचणी नंतर त्यांना कोविड होण्याची शक्यता आहे. कारण कधी कधी लक्षणं दिसून येत नाहीत. पण नंतर लगेचच व्हायरस वाढण्याची शक्यता असते. कोविड-19 हा SARS-COV-2 सारखा पसरणारा नाही. परंतु अशा प्रकारे संपर्कात येऊन तो पसरण्याची शक्यता जास्त आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मास्क घालून फिरणं हा यावर एक चांगला उपाय आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या