Home /News /lifestyle /

आता कोरोना रुग्णांना दिल्या जाणार प्राण्यांच्या Antibodies; लवकरच होणार ट्रायल

आता कोरोना रुग्णांना दिल्या जाणार प्राण्यांच्या Antibodies; लवकरच होणार ट्रायल

भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी (antibodies) तयार केल्या आहेत.

    नवी दिल्ली, 09 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसवर (coronavirus) विविध औषधांनी उपचार केले जात आहे. लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. शिवाय प्लाझ्मा थेरेपीचाही वापर करण्यात आला, ज्यामध्ये कोरोनामुक्त रुग्णांचे प्लाझ्मा कोरोनाग्रस्तांना देण्यात आले. मात्र ही प्लाझ्मा थेरेपी फारशी प्रभावी नसल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने  (ICMR) स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांना प्राण्यांच्या शरीरातील Antibodies दिल्या जाणार आहेत. लवकरच होणार ट्रायल दिले जाणार आहेत. आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल (Biological E. Limited, Hyderabad) कंपनीने मिळून एक अँटिसेरा (Antisera) विकसित केलं आहे. ज्याच्या मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. आता लवरकरच हे क्लिनिकल ट्रायल सुरू केलं जाणार आहे. अँटिसेरा हे एक ब्लड सीरम आहे. ज्यामध्ये एखाद्या विशेष आजाराविरोधात लढण्याची क्षमता असणाऱ्या अँटिबॉडीजचं (antibody) प्रमाण अधिक असतं. कोणत्याही विशेष संक्रमणाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती लगेच वाढवण्यासाठी माणसांना हे सीरम इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जातं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांनी बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिबॉडी तयार केल्या आहेत. हे वाचा - कोरोना काळात हेल्दी राहण्यासाठी काय आणि किती खावं? फॉलो करा हा Diet याआधीदेखील रेबीज, हेपेटायटिस, वॅक्सिनिया व्हायरस, टिटॅनस, डिप्थिरिया यासारख्या अनेक व्हायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनवर अशा पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत, असं आयसीएमआरने सांगितलं. आता कोरोनाव्हासरवर उपचारासाठी घोड्यांना निष्क्रिय Sars-Cov-2 चं इंजेक्शन देऊन हे अँटिसेरा विकसित करण्यात आलं आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने मिळून हे अँटिसेरा विकसित केलं आहे. आम्ही घोड्याचं सेरा तयार केलं आहे. घोड्यांवर सेराचा अभ्यासही पूर्ण केला आहे.  आम्हाला आता याच्या क्लिनिक ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे. हे वाचा - जगभरात Corona चं संकट असताना चिनी नागरिक लुटत आहेत सुट्ट्यांचा आनंद, पाहा PHOTO कोरोनामुक्त रुग्णांच्या प्लाझ्माचा वापरही असाच केला जातो. मात्र या प्लाझ्मामधील अँटिबॉडीजची पातळी प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असते. ज्यामुळे त्याचा वापर करताना अडचणी येतात. हे अँटीसेरा कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी फायद्याचं तर ठरेलच शिवाय कोरोनापासूनही बचाव करण्यासाठीही याचा वापर करता येईल, असा विश्वास आयसीएमआरने व्यक्त केला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या