Home /News /coronavirus-latest-news /

लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्याची तयारी; चिमुकल्यांसाठी खास मेडिसीन किट

लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्याची तयारी; चिमुकल्यांसाठी खास मेडिसीन किट

लक्षणं दिसणाऱ्या 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी हे खास मेडिसीन किट तयार करण्यात आलं आहे.

    अमन शर्मा/लखनऊ, 09 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये (Coronavirus in child) संसर्गाचं प्रमाण जास्त दिसून येत आहे. शिवाय तिसऱ्या लाटेचाही लहान मुलांना जास्त धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आता लहान मुलांचा कोरोनापासून बचाव कऱण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. लहान मुलांसाठी लवकरात लवकर कोरोना लस आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता तर मुलांसाठी खास कोरोना औषधाचं किटही तयार करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश (Uttar pradesh) सरकारने लहान मुलांसाठी खास असं मेडिसीन किट (medicine kits) तयार केलं आहे. या कीटमध्ये सीरम आणि मुलांना चावून खाता येतील अशा गोळ्या आहेत.  15 जूनपासून हे किट मोफत वाटप केलं जाणार आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह यांनी न्यूज 18 ला सांगितलं. आरोग्यमंत्री जयप्रताप सिंह यांनी सांगितलं, आम्ही हे मेडिसीन किट लहान मुलांसाठी मोफत देणार आहोत. मुलांचं वय आणि वजन यानुसार डोस देणार आहोत.  दारोदारी जाऊन प्रौढ नागरिकांची तपासणी करणाऱ्या आशा वर्कर्समार्फत हे मेडिसीन किट दिलं जाईल. ज्यांच्यामध्ये सर्दी आणि खोकला अशी इन्फ्लुएंझाची लक्षणं दिसत आहेत, अशा मुलांना आठवडाभर ही औषध देण्यास त्यांच्या पालकांना सांगितलं जाणार आहे. हे वाचा - 2 आठवड्यांपूर्वी लाँच झालेल्या कोरोना औषधाची कमाल; 12 तासांतच रुग्णाला डिस्चार्ज तीन प्रकारचे किट्स आहेत. सहा वर्षांखालील मुलांसाठी, सहा ते बारा वयोगट आणि बारा ते अठरा वयोगटासाठी.  एका पाकिटातून या औषधाचं वाटप केलं जाणार आहे. यावर कोरोना की जंग में हर जीवन अनमोल असा संदेश देण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी सांगितलं,  याआधी प्रौढांमध्ये सर्दी-खोकला आणि श्वसनसंबंधी इन्फ्ल्युएंझासारखी लक्षणं दिसल्यास त्यावर वेळीच औषधं न घेतल्यास ती कोरोनासारख्या लक्षणांमध्ये बदलतात असं आम्ही आतापर्यंत पाहिलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका आहे, असं म्हटलं जातं आहे. म्हणून आम्ही लहान मुलांसाठी हे मेडिसीन किट तयार केलं आहे. हे वाचा - बाबा रामदेवांना पुन्हा धक्का; भूताननंतर नेपाळमध्येही कोरोनिल वितरणावर बंदी याआधी यूपी सरकारने 12 वर्षांखालील मुलं असलेल्या पालकांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्याचा निर्मय घेतला आेह. जेणेकरून मुलांना कोरोनापासून वाचवता येईल. अशा पालकांसाठी खास लसीकरण केंद्रही तयार करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून त्यांच्या मुलांचं ओळखपत्र घेतलं जातं आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात लहान मुलांसाठी कमीत कमी 100 बेड्स तयार ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी गेल्या महिन्यात दिल्या होत्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Medicine

    पुढील बातम्या