मुंबई, 25 एप्रिल : देशात वाढत असलेल्या कोरोनाचा (Covid-19) फटका क्रिकेट विश्वालाही बसला आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमच्या सदस्य वेदा कृष्णमूर्तीच्या (Veda Krishnamurthy) आई चेलुवम्बदा देवी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कर्नाटकच्या या क्रिकेटरनं शनिवारी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. वेदानं 47 वन-डे आणि 76 टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. माझा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असून माझ्या बहिनीला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती देखील वेदानं दिली आहे. वेदानं केलेल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, “आम्माच्या निधनानंतर तुम्ही केलेल्या सांत्वनाबद्दल मी आभारी आहे. आई शिवाय माझ्या कुटुंबाचा विचारही केला जाऊ शकत नाही, हे तुम्ही समजू शकता. तुम्ही माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा, माझा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा सन्मान कराल अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीमधून जाणाऱ्या सर्वांबद्दल मला संवेदना आहे.”
( वाचा: धक्कादायक! वयाच्या 33व्या वर्षी भारतीय फास्ट बॉलरचं निधन ) वेदानं 48 वन-डे मध्ये 829 रन केले असून 3 विकेट्स देखील घेतल्या आहेत. या प्रकारात तिच्या नावावर 8 अर्धशतक आहेत. तसेच 76 टी 20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 2 अर्धशतकासह 875 रन केले आहेत. वेदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक टीमची सदस्य आहे.