मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /उपचार आणि बचावही; कोरोनाविरोधात 99 टक्के प्रभावी असं टू इन वन Nasal spray

उपचार आणि बचावही; कोरोनाविरोधात 99 टक्के प्रभावी असं टू इन वन Nasal spray

Sanotize nasal spray कोरोनाविरोधात 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Sanotize nasal spray कोरोनाविरोधात 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Sanotize nasal spray कोरोनाविरोधात 99 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

    मुंबई, 27 मे : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (corona second wave) हाहाकार माजवला आहे. वैद्यकीय सोई-सुविधा अपुऱ्या पडत असून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी लसीकरण हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे. मात्र भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशात लसीकरण पूर्ण व्हायला खूप वेळ लागेल. त्यातच लसीकरणासाठी लशी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे. दरम्यान सध्या कॅनडाच्या एका कंपनी सॅनोटाईझच्या नेझल स्प्रेची (sanotize nasal spray) चांगलीच चर्चा आहे. हा स्प्रे कोरोना रोखण्यात 99 टक्के प्रभावी आहे, असा दावा सॅनोटाईझ या कंपनीनं केला आहे. तसंच कोरोनापासून बचाव आणि कोरोनावर उपचार म्हणूनही तो वापरता येईल.

    हा नेझल स्प्रेचं वैशिष्ट्यं, ते कसं काम करतो?, भारतात कधीपर्यंत येईल?, याची किंमत किती असेल? अशी बरीच माहिती दैनिक भास्करने सॅनोटाईझ कंपनीचे फाऊंडर गिली रेगवे यांच्याकडून मिळवली आहे.

    नेझल स्प्रेच्या 99 टक्के प्रभावी

    या नेझल स्प्रेवर ब्रिटन आणि न्यूझीलंडमध्ये क्लिनिकल चाचणी झाली आहे. चाचणीदरम्यान याचा एफिकसी रेट खूपच चांगला असल्याचे दिसून आले. अगदी पहिल्या कोरोना विषाणूसोबतच, यूकेमध्ये आढळलेल्या नवीन स्ट्रेनवरही हा नेजल स्प्रे तितकाच प्रभावी असल्याचे चाचण्यांमध्ये आढळून आले. कॅनडामध्येही याची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

    हे वाचा - VIDEO: लस घ्या आवडत्या खेळाडूला भेटा; अमेरिकेत हायस्कूलच्या मुलांना प्रोत्साहन

    हा स्प्रेची चचणी करण्यासाठी ‘डबल ब्लाइंड प्लेसिबो कंट्रोल’ पद्धत वापरण्यात आली. यासाठी दोन ग्रुप बनवले. एका ग्रुपला प्लेसिबो म्हणजे कोणताही सामान्य नेझल स्प्रे दिला आणि दुसऱ्या ग्रुपला सॅनोटाईझ नेझल स्प्रे दिला. त्यानंतर 24 तासांत सॅनोटाईझ स्प्रे दिलेल्या लोकांमध्ये 95 टक्के व्हायरस लोड कमी झाल्याचं दिसून आलं. तर तीन दिवसांत 99 टक्के लोड कमी झाला. ज्यांच्यावर प्रयोग केला, ते सर्वजण कोरोनाबाधित होते. याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध ‘जर्नल ऑफ इन्फेक्शन’ मध्ये पब्लिश झाला आहे.

    सॅनोटाइझ कंपनीने लॅबमध्ये या स्प्रेची टेस्टिंग केल्यानंतर याचा मॅन्यफॅक्चरिंग फॉर्म्युला अमेरिकेच्या उटा यूनिव्हर्सिटीत (Utah State University) पाठवला. तिथं युनिव्हर्सिटीच्या अँटी व्हायरल इन्स्टिट्यूटमध्ये लॅब टेस्टिंग केल्यानंतर हा स्प्रे 99 नव्हे तर 99.9% प्रभावी असल्याचं सांगितलं.

    स्प्रे कोरोनाला कशा प्रकारे लढा देतो?

    या स्प्रेचे वैशिष्ट यातील नैसर्गिक घटक आहे. हा स्प्रे नायट्रिक ऑक्साईडपासून बनला आहे, जे केमिकल आपल्या शरीरात आधीपासूनच उपलब्ध असते. त्यामुळे या स्प्रेशी जुळवून घेण्यास आपल्या शरीराला कोणतीही अडचण येत नाही. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. नायट्रिक ऑक्साईड हे अँटी इफेक्टिव मायक्रोबियल म्हणजेच विषाणूंची वाढ रोखणारे केमिकल आहे.

    हे वाचा - कोरोना लसीकरणाबाबत प्रत्येक आरोपांचं खंडन; केंद्राने दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

    ज्याप्रमाणे हँड सॅनिटायझर हातावर विषाणू टिकू देत नाही. त्याचप्रमाणे, हा नेझल स्प्रे नाकामध्ये एक संरक्षक कवच तयार करतो. यामुळे विषाणू नाकामध्ये येताच मारले जातात. तसंच यामध्ये असलेले नायट्रस ऑक्साईड विषाणूंना नाकातील रिसेप्टर्सच्या वाहिन्यांमध्ये जाण्यापासून रोखतात.

    हा स्प्रे कोण वापरू शकतं?

    कोरोनावरील उपचारासाठी आणि कोरोनापासू बचावासाठीही या स्प्रेचा वापर केला जाऊ शकतो. जर केवळ कोरोनापासून बचावासाठी याचा वापर करत असाल, तर दिवसातून एक किंवा दोन वेळा, एक महिन्यापर्यंत याचा वापर करावा. जर कोरोनावरील उपचारादरम्यान याचा वापर करत असाल, तर दिवसातून चार ते पाच वेळा याचा वापर करावा. उपचारासाठी किती दिवस वापरायचे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे. कोरोना लस घेतलेले लोकही हा स्प्रे वापरू शकतात. लसीकरणासाठी विलंब होत असेल, त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये हा स्प्रे तुम्हाला सुरक्षा पुरवेल. मात्र लस घेणं अनिवार्य आहे.

    भारतातही लवकरच उपलब्ध होणार हा स्प्रे

    इस्रायल आणि न्यूझीलंडने या स्प्रेला आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरास परवानगी दिली आहे. सॅनोटाइझ कंपनी भारतातील एखाद्या कंपनीसोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहेत. कित्येक कंपन्यांनी यामध्ये रुची दर्शवली आहे. काही मोठ्या औषधनिर्माण कंपन्यांशी चर्चाही सुरू आहे. त्यानंतर भारतात या स्प्रेच्या उत्पादन आणि विक्रीसाठी मान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुरू होईल. उत्पादन घेण्यासाठी एखाद्या कंपनीसोबत करार झाल्यानंतर भारताचे सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) आमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल. त्यानंतर मग याच्या वापरावरील निर्बंध सरकारच ठरवेल.

    हे वाचा - एकाच व्यक्तीने वेगवेगळी कोरोना लस घेणं किती सुरक्षित? केंद्राने दिली मोठी माहिती

    सॅनोटाइझचं उत्पादन घेणारी कंपनी याची किंमत ठरवेल. जास्तीत जास्त लोकांना ही उपलब्ध व्हावी यासाठी याची किंमत अगदीच जास्तही नसणार आहे, असं कंपनीनं सांगितलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Corona vaccine, Coronavirus