मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना लसीकरणात Mix And Match चा मोठा प्रयोग; एकाच व्यक्तीला दिल्या जाणार 2 लशी

कोरोना लसीकरणात Mix And Match चा मोठा प्रयोग; एकाच व्यक्तीला दिल्या जाणार 2 लशी

कोरोना लशीचा (Corona vaccine) हा प्रयोग यशस्वी ठरला तर त्याचा मोठा फायदा होणार आहे.

कोरोना लशीचा (Corona vaccine) हा प्रयोग यशस्वी ठरला तर त्याचा मोठा फायदा होणार आहे.

कोरोना लशीचा (Corona vaccine) हा प्रयोग यशस्वी ठरला तर त्याचा मोठा फायदा होणार आहे.

ब्रिटन, 04 फेब्रुवारी: सध्या कोरोना लशीचे (corona vaccine) दोन डोस घेणं आवश्यक आहे. त्यामुळं लोकांना काही आठवड्यांच्या अंतरानं एकाच प्रकारच्या कोविड लशीचे दोन डोस दिले जात आहेत. पण आता एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लशीचे डोस दिले जाणार आहेत. कोविड-19 च्या (Covid 19) दोन वेगवेगळ्या लशी (Vaccine) एकत्र केल्या तर त्याचा काय परिणाम होईल, अशी पद्धत योग्य ठरेल का, याचा अभ्यास ब्रिटनमधील (Britain) शास्त्रज्ञ करणार आहेत. गुरुवारपासून या अभ्यासाला सुरुवात होत आहे.

ब्रिटन आणि अमेरिकेतील लसीकरणासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लस अदलाबदल करणं योग्य नाही, मात्र दुसर्‍या डोससाठी आधी दिलेल्या लसीचा डोस उपलब्ध नसेल किंवा आधी कोणती लस दिली हे माहिती नसल्यास दुसऱ्या वेळी वेगळ्या लशीचा डोस देता येऊ शकतो.

या अभ्यासात सहभागी होणाऱ्यांना प्रथम अ‍ॅस्ट्राझेनेका(AstraZeneca) लशीचा एक डोस दिला जाईल, त्यानंतर फायझरचा (Pfizer) एक डोस दिला जाईल किंवा या उलट क्रमानंही डोस दिला जाईल. हे संशोधन 13 महिने चालणार असून, चार आठवड्यांपासून ते 12 आठवड्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या अंतरानं लशीचा डोस देऊन त्याचीही चाचणी घेण्यात येणार आहे.

या अभ्यासामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी आपण लशी कशा वापरू शकतो याविषयी अधिक सखोल माहिती मिळेल, असं यूकेतील वैद्यकीय अधिकारी जोनाथन व्हॅन टॅम यांनी सांगितलं. ते म्हणाले की, जागतिक पातळीवर लशीचा पुरवठा मर्यादित असताना लाखो लोकांचं लसीकरण करण्याचं आव्हान आहे. अशा अभ्यासातील माहितीचा, डेटाचा चांगला उपयोग होईल. कोविड-19च्या लशी सर्वप्रकारचे कोरोना विषाणू मुख्यतः त्याच्यावरील स्पाइक प्रोटीन ओळखण्यासाठी शरीराला तयार करते. अ‍ॅस्ट्राझेनेका आणि फायझर या कंपन्यांनी या लशी तयार करताना वेगवेगळे तंत्रज्ञान वापरलं आहे. अस्ट्राझेनेकानं शरीरात स्पाइक जनुक वाहण्यासाठी फ्ल्यूच्या विषाणूचा वापर केला आहे, तर फायझरनं एमआरएनए नावाच्या जेनेटिक कोडचा एक तुकडा वापरून चरबीच्या आत असणाऱ्या स्पाईक प्रोटीन ओळखण्याच्या सूचना शरीराला देण्याचं तंत्रज्ञान वापरलं आहे.

हे वाचा -  कोरोना लशीनं केली कमाल! पहिल्या डोसनंतरच 67 टक्क्यांनी घटला संसर्ग

रशियाची Sputnik V कोरोना लस 91 टक्के प्रभावी असल्याचं आढळून आलं. अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि Sputnik V चे डोस देण्यात आले त्यामुळे ही लस प्रभावी ठरली आहे, असं काही इम्यूनॉलॉजिस्टसनी म्हटलं आहे.

ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमधील बायोमेडिकल तंत्रज्ञान विषयाचे सहयोगी प्राध्यापक अलेक्झांडर एडवर्ड्स यांच्या मते, अ‍ॅस्ट्राझेनेका आणि फायझर या लशी इतक्या वेगळ्या आहेत की, त्या एकत्रित प्रभावी  ठरतील का हे सांगणं कठीण आहे.  ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमधील एका नवीन अभ्यासाचे प्रमुख आणि ज्यांनी अ‍ॅस्ट्राझेनेका लस विकसित करण्यास मदत करणाऱ्या मॅथ्यू स्नॅप यांच्या मते,  त्यांनी 50 वर्षे वयावरील स्वयंसेवकांना या अभ्यासात सहभागी होण्याचे आवाहन केलं असून, 800 पेक्षा जास्त लोक यात भाग घेतील, अशी अपेक्षा आहे.

हे वाचा - Corona Vaccine : कोरोनावर लस मिळाली, पण पाकिस्तानला वाटते याची मोठी भीती

दोन वेगवेगळ्या लशी वेगवेगळ्या डोससाठी वापरता आल्या, तर लशी देण्याच्या प्रक्रियेत मोठी लवचिकता निर्माण होईल, असं त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. कोरोनाच्या नवीन विषाणूपासून संरक्षणासाठी प्रतिकार शक्ती टिकून राहण्याचा कालावधी दीर्घ करण्यासाठी याचा उपयोग होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही आठवड्यांत, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि इतर असंख्य देशांना लशीचा पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. अ‍ॅस्ट्राझेनेकानं लशीचं उत्पादन करण्यास उशीर होत असल्यानं वितरित होणाऱ्या डोसेसची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे, तर फायझरनं आपल्या बेल्जियममधील कारखान्यात सुधारणा करण्यासाठी लसीचं वितरण कमी केलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Covid19, Oxford, Research