जाहिरात
मराठी बातम्या / देश / पुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला पुन्हा सुरुवात

पुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला पुन्हा सुरुवात

पुढील महिन्यापासून इतर देशांना भारताकडून लसी, ‘Vaccine Friendship’ ला पुन्हा सुरुवात

कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशाने वेग घेतला असून पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना (India to provide vaccines to other country from next month) लसी पुरवायला सुरुवात करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : कोरोना लसीकरणाच्या बाबतीत देशाने वेग घेतला असून पुढील महिन्यापासून भारत इतर देशांना (India to provide vaccines to other country from next month) लसी पुरवायला सुरुवात करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. भारतात सुरु असलेल्या लसीकरणाच्या महाअभियानात आतापर्यंत 81 कोटींपेक्षा (India vaccinates more than 81 crore citizens) अधिक लसी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या 11 दिवसांतच यातील 10 कोटी लसी दिल्या गेल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. जगाला करणार मदत व्हॅक्सिन मैत्री या संकल्पनेनुसार भारत जगातील इतर देशांना कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा करणार असून त्यामुळे अनेक गरीब आणि गरजू देशातील नागरिकांना लसी मिळणे शक्य होणार आहे. भारतात लसींच्या उत्पादनाने वेग घेतला असून बायोलॉजिकल-ई कंपनीच्या लसीदेखील आता बाजारात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत वापरासाठी लसी कमी पडणार नसल्याचं मांडविया यांनी म्हटलं आहे. ‘कोव्हॅक्स’मध्ये योगदान कोव्हॅक्स ही संयुक्त राष्ट्रसंघाची संकल्पना असून या अंतर्गत जगातील समृद्ध देशांकडून विकसनशील आणि गरीब राष्ट्रांना लसींचा पुरवठा करण्यात येतो. अनेक देशांना लसी विकत घेणं परवडत नाही. लसी आपल्या देशात तयार करण्याचं तंत्रज्ञानही त्यांना परवडत नाही. अशा देशातील नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांना श्रीमंत देशांकडून लसींचा पुरवठा केला जातो. हे वाचा - भयंकर! पहिल्या मजल्यावरून आईला दिला धक्का, डोकं फुटून झाला मृत्यू यापूर्वीही केला होता प्रयोग यापूर्वीदेखील भारताने इतर देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र त्यावेळी आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे देशात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. आपल्या देशात लसी उपलब्ध नसताना परदेशात लसी निर्यात करण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावर विरोधकांनी कडाडून टीका केली होती. मात्र आता पुन्हा एकदा सरकारने लसी निर्यात करण्याची आणि बाहेरच्या देशांना पाठवण्याची घोषणा केली आहे. आता यावर विरोधी पक्षातून काय प्रतिक्रिया उमटते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात