लंडन, 28 सप्टेंबर : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थिती आता तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अद्याप हे स्पष्ट नाही झाले आहे, कोरोनाच्या कोणत्या स्थितीला नवीन लाट म्हणावे. यातच यूकेच्या एडिनबर्ग विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. independent.co.uk च्या रिपोर्टनुसार, ब्रिटिश कोरोना तज्ज्ञ मार्क वूलहाऊस म्हणतात की, लॉकडाऊनमुळे कोरोना दूर करत नाही, तर समस्या थोडीशी वाढते. ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, आणि देशात आता पुन्हा राष्ट्रीय लॉकडाऊन जाहीर करण्याची परस्थिती आली आहे. वाचा- माणसांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्यासाठी लाखो शार्कचा बळी जाणार प्राध्यापक मार्क वूलहाऊस यांनी सांगितले की, कोरोना टाळण्यासाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत जेणेकरून या संसर्ग कमी होईल, मात्र व्हायरस कायमचा जाऊ शकत नाही. बीबीसी वन कार्यक्रमात मार्क यांनी, ब्रिटन संदर्भात सांगितले की, देशातील परिस्थिती पाहता सप्टेंबरमध्ये पुन्हा लॉकडाउनची आवश्यकताही होती. वाचा- अलर्ट! फक्त एक सूक्ष्मकण असा पसरवू शकतो Coronavirus जेव्हा प्रोफेसर मार्क वूलहाऊस यांना विचारले गेले की कोरोनाची तिसरी लाटही येईल का, तेव्हा ते म्हणाले की ते पूर्णपणे शक्य आहे. ते म्हणाले की, जर लस येत्या 6 किंवा 12 महिन्यांत येत नसेल, तर आपल्याला पर्यायी मार्ग शोधण्याची गरज आहे. वाचा- नवी समस्या! कोरोनावर मात केलेल्या रुग्णांमध्ये दिसत आहे ‘या’ आजाराची लक्षणं ब्रिटीश कोरोना व्हायरस तज्ज्ञ म्हणाले की, अलिकडच्या काळात विद्यापीठात कोरोनाबाबत अनेक संशोधन करण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत ब्रिटनमध्ये 4 लाख 34 हजार लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, यातील 41 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.