नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : मैत्रिणीसोबत संबंध (Extra Marital Affair) ठेवणाऱ्या पतीला अखेर महिलेने रंगेहाथ पकडलं. यासाठी पत्नीने एक आयडिया केली. ज्यामुळे पती आणि मैत्रिणीला रंगेहात पकडणं सोपं झालं.
टिकटॉकवर शौना नावाच्या एका महिलेने व्हिडीओ शेअर (Video) केला आहे. शौनाने यात लिहिलं आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून मला संशय येत होता. माझी मैत्रिण माझ्याच घरी राहत आहे. तिच्यात आणि पतीमध्ये विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. मात्र माझ्याकडे कोणताही पुरावा नव्हता. तो मिळावा यासाठी मी घरात एक सीक्रेट कॅमेरा लावला. ज्यामुळे मला त्या दोघांनाही पकडता आलं. (Wife puts secret camera in house husband was caught red handed with the womans friend)
या व्हिडीओमध्ये शौनाने आपल्या बेस्ट फ्रेंडला प्रश्न विचारला आहे. ती म्हणते, मी जेव्हा कामावर जात होते, तेव्हा तू माझ्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवत होतीस? हो की नाही?? यावर तिची मैत्रिण यास नकार देते आणि त्यानंतर शौनाचा पती येऊन आरडाओरडा करू लागतो.
हे ही वाचा-बाळासाठी 16 महिन्यांची कैद; नागपूरच्या तरुणीसोबत घडला थरकाप उडवणारा प्रकार
हा व्हिडीओ आतापर्यंत 9.1 मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओपूर्वी आणखी एक व्हिडीओ आहे ज्यात शौनाने कॅप्शन दिलं आहे की, जेव्हा तुम्ही आपल्या मैत्रिणीला घरात राहायला जागा देता आणि ती तुम्ही कामावर गेल्यानंतर तुमच्याच पतीसोबत शारीरिक संबंध ठेवते. मात्र तुम्ही घरात सीक्रेट कॅमेरा लावल्याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Wife and husband