मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /तरुणाने अवघ्या 16 सेकंदासाठी मास्क काढलं अन् झालं लाखोंचं नुकसान; काय आहे प्रकरण?

तरुणाने अवघ्या 16 सेकंदासाठी मास्क काढलं अन् झालं लाखोंचं नुकसान; काय आहे प्रकरण?

क्रिस्टोफर ओ टूलचा असा दावा आहे, की त्याने शॉपिंग करत असताना काही वेळासाठी आपलं मास्क चेहऱ्यावरुन खाली काढलं होतं. मात्र, यामुळे त्याला मोठा दंड भरावा लागला.

क्रिस्टोफर ओ टूलचा असा दावा आहे, की त्याने शॉपिंग करत असताना काही वेळासाठी आपलं मास्क चेहऱ्यावरुन खाली काढलं होतं. मात्र, यामुळे त्याला मोठा दंड भरावा लागला.

क्रिस्टोफर ओ टूलचा असा दावा आहे, की त्याने शॉपिंग करत असताना काही वेळासाठी आपलं मास्क चेहऱ्यावरुन खाली काढलं होतं. मात्र, यामुळे त्याला मोठा दंड भरावा लागला.

नवी दिल्ली 02 फेब्रुवारी : कोरोना काळात (Corona Pandemic) काही सवयी आपल्या दैनंदिन आयुष्याचा भागच होऊन गेल्या आहेत. यामध्ये चेहऱ्यावर सतत मास्क (Face Mask) लावणं, सॅनिटायझरचा वापर करणं आणि वारंवार हात धुणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत. यातील मास्क लावण्याची सवय केवळ आरोग्यासाठीच नाही तर खिशासाठीही चांगली असते. मात्र, असं न केल्याने ब्रिटनमधील एका व्यक्तीला लाखो रुपयांचा दंड भरावा लागला (Fine for Taking off Mask).

Anything for Pets : मांजरांसाठी बुक केलं Private Jet, खर्च केले लाखो रुपये

क्रिस्टोफर ओ टूलचा असा दावा आहे, की त्याने शॉपिंग करत असताना काही वेळासाठी आपलं मास्क चेहऱ्यावरुन खाली काढलं होतं. मात्र, यामुळे त्याला मोठा दंड भरावा लागला. लिवरपूल इकोसोबत बोलताना क्रिस्टोफरने सांगितलं, की त्याला मास्क लावण्याच्या नियमाचं पालन करायचं नव्हतं, असं अजिबातही नाही. त्याने अवघ्या काही वेळासाठीच शॉपिंग करताना आपलं मास्क काढलं, मात्र यामुळे त्याला 2 लाख रुपये दंड द्यावा लागला.

क्रिस्टोफर ओ टूलसोबत ही घटना तेव्हा घडली जेव्हा तो प्रेस्कॉटमध्ये B&M मध्ये शॉपिंग करत होता. क्रिस्टोफरच्या म्हणण्यानुसार त्याला ठीक वाटत नसल्याने त्याने केवळ 16 सेकंदासाठी आपलं मास्क काढलं. इतक्यात पोलीस अधिकारी स्टोरमध्ये आले आणि मास्क न घातल्याने त्याचं नाव नोट करून घेतलं. ही घटना मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात घडली, जेव्हा मास्क वापरणं बंधनकारक होतं. घटनेनंतर काही दिवसातच क्रिस्टोफरला क्रिमिनल रेकॉर्ड ऑफिसमधून एक पत्र आलं. यात 10 हजार रुपये फाईन देण्यास सांगण्यात आलं होतं.

Shocking! HIV रुग्णाच्या शरीरातच कोरोनामध्ये 21 बदल; संशोधकांनी व्यक्त केली भीती

क्रिस्टोफरने या लेटरच्या ऐवजी अधिकाऱ्यांनी ई-मेलच्या माध्यमातून फाईन न देण्यासाठी स्पष्टीकरण दिलं. यानंतर त्याला आणखी एक पत्र आलं, यात दंडाची रक्कम वाढवून 2 लाख रूपये केली गेली होती. क्रिस्टोफरच्या म्हणण्यानुसार, हा दंड भरण्यासाठी त्याचा महिन्याभराचा पगार जाईल. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचलं असून त्याला कायदेशीर लढाई लढावी लागेल.

First published:

Tags: Mask, Sanitizer and mask