Home /News /coronavirus-latest-news /

काय सांगता! चेहरा रिंकल फ्री करणारं इंजेक्शन घेतल्यास कोरोना होत नाही?

काय सांगता! चेहरा रिंकल फ्री करणारं इंजेक्शन घेतल्यास कोरोना होत नाही?

चेहऱ्यावरील सुरकुत्यांवर उपचार म्हणून वापरलं जाणारं बोटॉक्स इंजेक्शन (Botox injection) कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचा दावा, संशोधकांनी केला आहे.

पॅरिस, 18 सप्टेंबर : जगातील अनेक देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं (Coronavirus) कहर केला आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारावर जगभरात संशोधन सुरू आहे. सध्या मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण या कोरोना प्रतिबंधासाठी प्रमुख उपाययोजना ठरत आहेत. सध्या कोरोनाचा संसर्गावर काही प्रमाणात प्रभावी ठरणाऱ्या लस उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वच देश लसीकरणावर भर देताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फ्रान्समधील संशोधकांनी बोटॉक्स हे इंजेक्शन (Botox injection) कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे (Botox injection for coronavirus) . वय वाढलं तरी आपण तरूण दिसावं, असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु यासाठी काही जण विशेष वैद्यकीय उपचार घेतात. बोटॉक्स ट्रिटमेंट (Botox Treatment) हा या उपचारांतील एक भाग आहे. या इंजेक्शच्या माध्यमातून ज्या भागात सुरकुत्या आहेत, तिथं औषध पोहोचवलं जातं. यात बॉटुलिनम नावाचं टॉक्सिन (Toxin) असतं. हे टॉक्सिन स्नायू डॅमेज करणाऱ्या एसिटिलकोलीनचं शरीरात वाढणारं प्रमाण रोखतं. यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात, तसंच सुरकुत्याही कमी होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखणारं हे बोटॉक्स इंजेक्शन कोरोना होण्यापासून रोखतं, असा दावा नुकताच फ्रान्समधील (France) संशोधकांनी केला आहे. हे संशोधन फ्रान्समधील मॉन्टिपेलियर युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या वैज्ञानिकांनी केलं आहे. या संशोधनाचा अहवाल स्टोमॅटोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हे वाचा - आता घरातही हटवू नका चेहऱ्यावरील मास्क; सोशल डिस्टन्सिंग ठेवूनही कोरोनाचा धोका मागील वर्षी जुलै महिन्यात बोटॉक्स इंजेक्शन घेतलेल्या 200 रुग्णांवर हे संशोधन करण्यात आलं. त्यापैकी केवळ 2 रुग्णांमध्येच कोरोनाची लक्षणं दिसल्याचं या संशोधनातून स्पष्ट झालं. कोरोना व्हायरस (Coronavirus) हा शरीरातील एसिटिलकोलीनच्या मदतीनं पेशींमध्ये पसरतो. बोटॉक्स इंजेक्शन हे या रसायनाला नियंत्रणात आणतं आणि माणसाचा कोरोनापासून बचाव होतो, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे. बोटॉक्स इंजेक्शनवर अजून संशोधन करण्याची गरज असून, या माध्यमातून कोरोनावर किती नियंत्रण मिळवता येतं याचाही शोध घेणं आवश्यक असल्याचं फ्रेंच संशोधकांनी सांगितलं आहे. संशोधकांच्या पथकानं सांगितलं की कोरोना संसर्ग झालेले सर्वसामान्य नागरिक आणि बोटॉक्स इंजेक्शन घेतेलेले नागरिक यांच्यात लक्षणीय फरक दिसून आला. फ्रान्समधील ज्या भागात कोरोना संसर्गाचं प्रमाण आधिक होतं त्या भागातील नागरिकांना या संशोधनात सामील करून घेण्यात आलं. दक्षिण फ्रान्समधील एका 64 वर्षाच्या महिलेला या संशोधनात सामील करून घेण्यात आलं आणि तिला बोटॉक्सचं इंजेक्शन दिलं गेलं. या महिलेच्या मुलीला कोरोना संसर्ग झाला परंतु, या महिलेला काहीही झालं नाही. आमच्या गावातील प्रत्येक माणसाला कोरोनाचा संसर्ग झाला परंतु, मला काही झालं नाही, असा दावा या महिलेनं केला. इंजेक्शन घेतलेल्या  193 लोकांपैकी फक्त दोघांना कोरोना संशोधकांनी बोटॉक्स इंजेक्शनचा कोरोनाबाधित रुग्णांवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी 193 लोकांवर संशोधन केलं. यात 146 महिलांचा समावेश होता. त्यांचं सरासरी वय 50 वर्ष होतं. या सर्व रुग्णांनी बोटॉक्स इंजेक्शन घेतलं होतं. या संशोधनात सामील रुग्णांचं 3 महिन्यांपर्यंत निरीक्षण करण्यात आलं. या दरम्यान कोणाला कोरोना संसर्ग झाला कि नाही, याकडं विशेष लक्ष दिलं गेलं. यापैकी कोणत्याही रुग्णाचा कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह (Positive) आला नाही. मात्र 2 रुग्णांमध्ये लक्षणं दिसून आली. अन्य रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नसल्याचं या संशोधनाच्या अहवाल म्हटलं आहे. कोरोना संक्रमिताच्या संपर्कात येऊनही कोरोनाची लागण नाही 53 वर्षाची एक महिला लासव्हेगास येथे ट्रिपला जाऊन आली होती. तिच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे दिसली पण रिपोर्ट निगेटिव्ह होता. 70 वर्षाची एक महिला आजारी पडली पण तिची तपासणी केली गेली नाही. या संशोधनात सहभागी एकाही रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची गरज भासली नसल्याचं संशोधनाच्या अहवालात म्हटलं आहे. हे वाचा - Explainer - 86.64% नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडी; मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली? बोटॉक्स इंजेक्शन अनेक आजारांवर उपचार म्हणून वापरलं जातं. मायग्रेनचा विकार असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन दिल्यास त्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. ब्रिटनमधील सुमारे 10 लाख लोक बोटॉक्स ट्रिटमेंट घेतात. अमेरिकेतही ही ट्रीटमेंट घेणं कॉमन समजलं जातं. आता   फ्रेंच संशोधकांच्या दाव्यानुसार, बोटॉक्स इंजेक्शनमुळे कोरोना रोखता येऊ शकतो.  मात्र याबाबत अधिक संशोधन सुरु असून, येत्या काळात या संदर्भात ठोस उपचारपध्दती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Coronavirus, France, Injection

पुढील बातम्या