• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • आता घरातही हटवू नका चेहऱ्यावरील मास्क; सोशल डिस्टन्सिंग ठेवूनही कोरोनाचा धोका

आता घरातही हटवू नका चेहऱ्यावरील मास्क; सोशल डिस्टन्सिंग ठेवूनही कोरोनाचा धोका

फोटो सौजन्य - शटरस्टॉक

फोटो सौजन्य - शटरस्टॉक

घरात एकमेकांपासून 6 फूट अंतर राखणंही पुरेसं नाही.

  • Share this:
मुंबई, 17 सप्टेंबर : कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाला सुरुवात झाल्यापासून त्यावर विविध प्रकारचं संशोधन सुरू आहे. ज्याप्रमाणे कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरिएंट्स (Corona Variants) समोर येत आहेत, त्याचप्रमाणे या विषाणूबाबत नवीन माहितीही मिळत आहे. आतापर्यंत कोरोनापासून बचावासाठीसोशल डिस्टन्सिंग (Social distancing) राखण्याचा सल्ला दिला जातो आहे. पण घरामध्ये किमान सहा फूट अंतर राखलं तरी कोरोनाचा धोका आहे. कोरोनापासून बचावासाठी (Physical distancing not enough in house) हे अंतर पुरेसं नसल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. ‘सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटी’ नावाच्या एका नियतकालिकात हा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनामध्ये असं समोर आलं आहे, की कोरोनापासून बचावासाठी केवळ फिजिकल डिस्टन्सिंग (Physical distancing not enough) पुरेसं नाही. यासोबतच मास्क वापरणं आणि व्हेंटिलेशन या दोन गोष्टीही कोरोना संसर्गाबाबत (Corona virus) अत्यंत परिणामकारक ठरतात. संशोधकांनी यात हवेतून कोरोना विषाणूचा प्रसार (Covid spread) होताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात याबाबत अभ्यास केला. हे वाचा - मुंबईकरांवर बाप्पाने केली कृपा! गणेशोत्सवातच मिळाली मोठी GOOD NEWS घरांमध्ये किंवा एखाद्या खोलीमध्ये हवेचं व्हेंटिलेशन (Low ventilation) कमी प्रमाणात होत असतं. त्यामुळे अशा ठिकाणी एखादी कोरोनाग्रस्त व्यक्ती मास्क न वापरता बसली असेल, तर समोरची व्यक्ती सहा फुटांपेक्षा लांब (Six feet not enough to avoid corona) बसूनही तिला पहिल्या व्यक्तीमार्फत कोरोनाची लागण होऊ शकते.  डिस्प्लेसमेंट व्हेंटिलेशन (Displacement ventilation) असणाऱ्या रूम्समध्ये एअरोसोल्स अधिक वेगाने प्रवास करतात. बहुतांश घरांमध्ये अशाच प्रकारची व्हेंटिलेशन सिस्टिम उपलब्ध असते. यामुळेच संशोधकांनी फिजिकल डिस्टन्सिंगसोबतच मास्कचा (Mask is must along with distancing) वापर अगदी घरातही करण्याचा सल्ला दिला आहे. हे वाचा - कोरोना लढ्यात भारताची कमाल! यूके, यूएससह 18 देशांना एकत्र जमलं नाही ते एकट्याने करून दाखवलं एकूणच कोरोनाचं सातत्याने समोर येत असलेलं नवीन रूप, आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेली चुकीची माहिती या सगळ्यातून बचावासाठी आणखी काही दिवस तरी कोविड नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे.
First published: