मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांमध्ये आढळली Bone death ची गंभीर समस्या; लक्षणांमुळे मुंबईतील डॉक्टर चिंतेत

कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांमध्ये आढळली Bone death ची गंभीर समस्या; लक्षणांमुळे मुंबईतील डॉक्टर चिंतेत

कोरोनावरील (Coronavirus) उपचारांदरम्यान मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्सचा वापर करण्यात आल्याने एव्हीएनच्या (Avascular Necrosis) केसेस पुढे आल्या आहेत

कोरोनावरील (Coronavirus) उपचारांदरम्यान मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्सचा वापर करण्यात आल्याने एव्हीएनच्या (Avascular Necrosis) केसेस पुढे आल्या आहेत

कोरोनावरील (Coronavirus) उपचारांदरम्यान मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्सचा वापर करण्यात आल्याने एव्हीएनच्या (Avascular Necrosis) केसेस पुढे आल्या आहेत

मुंबई 05 जुलै: कोविड-19 (Covid 19) विषाणूने जगभरातील अनेकांचे प्राण घेतले आहेत. पण त्याचा प्रकोप अजूनही कमी झालेला नाही. या विषाणूचे नवे व्हेरियंट (Corona Variants) तयार होत आहेतच, त्याबरोबर कोविडची बाधा होऊन बरे झालेल्या रुग्णांमध्येही (Corona Patients) वेगवेगळी लक्षणं दिसून येत आहेत. मुंबईतील 40 वर्षांहून कमी वय असलेल्या तीन रुग्णांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस किंवा डेथ ऑफ बोन टिश्युज (Avascular Necrosis or Death of Bone Tissues) दिसून आल्याने मुंबईतील डॉक्टर चिंतेत आहेत. दोन महिन्यांपूर्वी कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकॉसिस किंवा ब्लॅक फंगस (Black Fungus) या आजारांची लक्षणं दिसून आली होती. तशीच आता मुंबईतील तीन रुग्णांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणं दिसून आली आहेत आणि येत्या काही महिन्यांत अशी लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू शकते अशी चिंता मुंबईतील डॉक्टरांना वाटत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोविड-19 बाधितांवर परिणामकारक ठरणारी स्टिरॉइड्स म्युकरमायकॉसिस झालेल्या आणि आता अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस झालेल्या रुग्णांना दिली होती. हा दोन्ही प्रकरणांमधील सामायिक घटक आहे. कोविडवरील उपचार घेतल्यानंतर 2 महिन्यांनी अव्हॅस्कुलर नेक्रॉसिसची लक्षणं दिसलेल्या 40 वर्षांखालील 3 रुग्णांवर माहिममधील हिंदुजा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी उपचार केले आहेत. माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर आणि ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. संजय अग्रवाल म्हणाले, ‘ त्या रुग्णांना मांडीच्या हाडाच्या वरच्या भागात दुखणं जणवलं, ते सगळे डॉक्टर होते म्हणून त्यांना हे लवकर लक्षात आलं आणि त्यांनी लगेच उपचारांसाठी हॉस्पिटल गाठलं.’

एकच नंबर! महाराष्ट्रानं करुन दाखवलं, लसीकरणात राज्याची विक्रमी नोंद

डॉ. अग्रवाल यांचा ‘अव्हॅस्कुलर नेक्रॉसिस अज ए पार्ट ऑफ लाँग कोविड-19 (Avascular necrosis as a part of long covid-19)’ हा रिसर्च पेपर प्रतिष्ठित मेडिकल जर्नल ‘BMJ Case Studies’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. ते म्हणाले, ‘ कोविड-19 वरील उपचारांदरम्यान मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्सचा वापर करण्यात आल्याने एव्हीएनच्या केसेस पुढे आल्या आहेत.’ इतर ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनीही टाइम्सला सांगितलं की त्यांच्याही पाहण्यात एव्हीएनच्या काही केसेस आल्या आहेत. सरकारी हॉस्पिटलमधील एका डॉक्टरांनी नाव प्रसिद्ध न करणऱ्याच्या अटीवर सांगितलं, की दीर्घकाळ कोविड-19 चा त्रास होणाऱ्या रुग्णांना स्टिरॉइड्स द्यावी लागतात आणि तोच चिंतेचा विषय ठरत आहे.

राज्य सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य आणि इंटेसिव्हिस्ट डॉ. राहुल पंडित म्हणाले, ‘ मी एव्हीएनचे पेशंट शोधतो आहे. सामान्यपणे स्टिरॉइड्सचा वापर झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांत पेशंटमध्ये एव्हीएनची लक्षणं दिसतात. आपल्याकडच्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा उच्चांक एप्रिलमध्ये गाठला गेला होता. त्यामुळे आता दोन ते तीन महिन्यांमध्ये एव्हीएनचे पेशंट सापडू शकतात असं मला वाटतं. या दुसऱ्या लाटेच्या काळात पेशंटना मोठ्या प्रमाणात स्टिरॉइड्स दिली गेली असल्याने आपल्याला लवकरच या रुग्णांमध्ये एव्हीएनची लक्षणं आढळू शकतात.’

अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस स्पेशलिस्ट असणाऱ्या डॉ. अग्रवाल यांनी यावर बायस्फोसफोनेट रिजिम नावाची एक मेडिकल ट्रिटमेंट विकसित केली आहे. जी गेल्या 20 वर्षांपासून जगभरात एव्हीएनच्या रुग्णांना उपचार देण्यासाठी वापरली जाते. त्यांच्या अभ्यासानुसार कोविड होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये दोन ट्रेंड दिसून येत आहेत जे खरोखर चिंताजनक आहेत. एक म्हणजे कोविड झालेला असताना पेशंटना corticosteroid prednisolone या स्टिरॉइडचा 758mg चा डोस दिला गेला. हाच डोस 2000mg इतका दिला गेला तर शरीरात एव्हीएनची समस्या निर्माण होऊ शकते. इतक्या कमी डोसमध्ये एव्हीएनची लक्षणं दिसणं ही एक चिंतेची बाब आहे. दुसरी चिंतेची बाब म्हणजे साधारणपणे स्टिरॉइड्स घेतल्यानंतर सहा महिने ते एका वर्षात एव्हीनए विकसित होतो पण तो कोविड पेशंटमध्ये लवकर विकसित होताना दिसतो आहे.

धक्कादायक! कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू

डॉ. अग्रवाल म्हणाले, ‘सहसा एव्हीन विकसित व्हायला इतका वेळ लागत असताना आमच्या पेशंट्समध्ये मात्र निदानानंतर 58 दिवसांत ही लक्षणं दिसून आली आहेत. कोविड-19 झालेला असताना स्टिरॉइड्स दिले गेलेल्या रुग्णांना खुब्यात किंवा मांडीत दुखणं जाणवत असेल तर त्यांनी MRI करून घ्यावा आणि त्यांना हिपचा एव्हीएन झाला नाही ना हे तपासून घ्यावं. त्यांनी जर लवकर बायस्फोस्फोनेट थेरेपी सुरू केली तर त्यांचा हा आजार लवकर बरा होऊ शकतो. ’

सामान्यपणे एव्हीएन झाल्यावर सर्जरी करावी लागते पण आता ज्या पेशंटना त्याची लक्षणं दिसली त्यांनी तातडीने उपचार घेतल्यामुळे त्यांना ही सर्जरी करण्याची गरज पडलेली नाही.

आतापर्यंत कन्फर्म केसेस 3 – corticosteroid हे जीवरक्षक स्टिरॉइड म्हणून कोविड पेशंटना देतात पण त्यामुळे Avascular necrosis (AVN) होण्याची शक्यता आहे.

केव्हा होतो एव्हीएन

- जेव्हा हाडांना होणारा रक्तपुरवठा तात्पुरता किंवा कायमचा थांबतो तेव्हा एव्हीएन विकसित होतो. हाडांना रुक्तपुरवठा न झाल्याने हाडातील टिश्यु मरण पावतात.

- सांध्यांनाही याचा फटका बसू शकतो.

- दीर्घकाळ corticosteroid किंवा अल्कोहोलचं सेवन, हाडांना दुखापत होणं, हाडं फ्रॅक्चर होणं किंवा ब्लड व्हेसल्सना दुखापत होणं यामुळेही AVN होऊ शकतो.

- प्रमुख लक्षण म्हणजे सांधे दुखणं आणि हालाचाली मर्यादित होणं.

First published:

Tags: Corona, Corona patient, Corona virus in india, Covid-19, Doctor contribution, Healthy bones, Side effects