Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 तासात 29 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू

कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 तासात 29 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू

Covishield vaccine: कोविशिल्ड घेतल्यानंतर एका 29 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Covishield vaccine: कोविशिल्ड घेतल्यानंतर एका 29 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Covishield vaccine: कोविशिल्ड घेतल्यानंतर एका 29 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मदुराई, 04 जुलै: देशात कोरोनाचा (Corona Virus) प्रसार रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत असताना तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना लसीकरण वेगानं सुरु आहे. मात्र असं असताना कोविशिल्ड घेतल्यानंतर एका 29 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. न्यू इंडियन एक्स्प्रेसनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 21 तासाच्या आत सरकारी राजाजी रुग्णालयात (GRH) जात असताना 29 वर्षीय इंजिनिअरचा शनिवारी मृत्यू झाला. डी अँड्र्यू सायमन असे मृत व्यक्तीचे नाव असून तो न्यू विलांगुडी येथे राहत होता.

तो युकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता आणि गेल्या ऑगस्टमध्ये तो मदुराईला आपल्या मूळ गावी परतला होता. परत आल्यापासून तो वर्क फ्रॉम होम करत होता.

हेही वाचा- एकच नंबर! महाराष्ट्रानं करुन दाखवलं, लसीकरणात राज्याची विक्रमी नोंद

त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, सायमननं नोकरी बदलली होती. त्यानंतर गेल्या चार महिन्यांपासून तो बेंगळुरूस्थित कंपनीत रुजू झाला होता. त्याचं घरुन काम चालायचं. त्याचं तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास सायमन आणि त्याची पत्नी सत्यमूर्ती नगर येथील सम्यनाल्लूर ब्लॉक प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. तिथे त्या दोघांनी कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेतला होता. रात्री दोघांनाही अंगदुखी सुरु होती. मात्र सकाळी सायमन बाथरुममध्ये गेला असता कोसळला, असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिल्याने त्याला तातडीने जीआरएच येथे दाखल करण्यात आल्याचं नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचा- सरकार Vs. ट्विटर संघर्ष शिगेला, 'या' प्रकरणात Twitter विरोधात पाचवा गुन्हा दाखल

जिल्हा लसीकरण अधिकारी (Immunisation Officer ) (DIO) डॉ केव्ही अर्जुन कुमार यांनी सांगितले, लसीकरणानंतरच्या प्रतीक्षा केंद्राच्या निरीक्षणामध्ये असताना लसीवर तत्काळ immediate allergic प्रतिक्रिया आल्याचा पुरावा नाही आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus