मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /ब्लॅक फंगसचा 35000 रुपयांचा उपचार फक्त 350 रुपयांत; पुण्याच्या डॉक्टरने सांगितला मार्ग

ब्लॅक फंगसचा 35000 रुपयांचा उपचार फक्त 350 रुपयांत; पुण्याच्या डॉक्टरने सांगितला मार्ग

पुण्याच्या डॉक्टरांनी 100 पट स्वस्त असा ब्लॅक फंगसवर उपचार सांगितला आहे.

पुण्याच्या डॉक्टरांनी 100 पट स्वस्त असा ब्लॅक फंगसवर उपचार सांगितला आहे.

पुण्याच्या डॉक्टरांनी 100 पट स्वस्त असा ब्लॅक फंगसवर उपचार सांगितला आहे.

पुणे, 07 जून : एकिकडे कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) वेग कमी होत असताना दुसरीकडे ब्लॅक फंगसचा (Black fungus) वेग वाढतो आहे. या रुग्णांची संख्या वाढते आहे. कोरोनामुक्त रुग्णांना ही समस्या बळावत असल्याने चिंता वाढली आहे. या आजारावरील उपचारही (Black fungus treatment)  खूप महाग आहे. पण ब्लॅक फंगसवर अगदी स्वस्तात उपचार करण्याचा मार्ग पुण्याच्या डॉक्टरने शोधला आहे.

ब्लॅक फंगसवरील उपचाराचा खर्च दिवसाला कमीत कमी 35000 रुपये आहे. पण हा खर्च 350 रुपयांपर्यंत करता येऊ शकतो. पुण्याच्या डॉक्टरांनी 100 पट स्वस्त असा ब्लॅक फंगसवर उपचार सांगितला आहे.

ब्लॅक फंगसवर अँम्फोटेरिसीन (amphotericin injections) हे औषध प्रभावी आहे. सध्या ब्लॅक फंगसवर उपचारासाठी वापरलं जात असलेलं लिपोझोमल अँम्फोटेरिसीन औषध खूप महाग आहे. पण अगदी यासारखंच असलेलं  कन्व्हेंशनल अँम्फोटेरेसीन हे यापेक्षा शंभरपट स्वस्त आहे. पण यासाठी योग्य देखरेख करण्याची गरज आहे.

हे वाचा - पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर तुमच्या कोरोना लसीकरणावर काय होणार परिणाम?

कन्व्हेंशनल अँम्फोटेरिसीन दिल्यानंतर रुग्णाची ब्लड क्रिएटिनिन (blood creatinine) लेव्हची तपासणी करणं आहे. हा शरीरातील एक नको असेलला घटक आहे, जो किडनीमार्फत शरीराबाहेर फेकला जातो. यासाठी एक दिवसआड ब्लड टेस्ट करण्याची गरज आहे. यामुळे किडनीमधील टॉक्सिसिटी समजेल.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजचे ईएनटी प्रमुख समीर जोशी यांनी सांगितलं की, त्यांनी ब्लॅक फंगसच्या 201 रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यापैकी 85 टक्के रुग्णांना कन्व्हेशनल अँम्फोटेरेसीन आणि सर्जरीनंतर बरे झाले आहेत. याआधीसुद्धा त्यांनी कन्व्हेशनल अँम्फोटेरिसीन पद्धतीने 65 रुग्णांवर उपचार केले. त्यापैकी 63 रुग्ण बरे झाले आहे. सामान्यपणे सर्जरी आणि कन्व्हेंशनल अँम्फोटेरिसीन एकत्रितरित्या योग्य पद्धतीने काम करतात.

हे वाचा - थरथर कापू लागले रुग्ण, ताप भरला; Black Fungus वरील औषधाचाच गंभीर दुष्परिणाम

कन्व्हेंशनल अँम्फोटेरिसीनमुळे किडनीला हानी पोहोचण्याची भीती असते, त्यामुळे लिपोझोमल अँम्फोटेरेसीनचा वापर जास्त होतो. पण दोन्ही औषध सारखेच आहेत. सुरक्षित असल्याने लिपोझोमल अँम्फोटेरिसीनचा वापर होतो, असं डॉ. समीर म्हणाले.

First published:

Tags: Coronavirus, Health