
देशात कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय झालेला आहे. आता सर्वांनाच कोरोनाची लस मोफत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.

मे महिन्यात राज्यांना देण्यात आलेली 25 टक्के लसीकरणाची जबाबदारीही केंद्र सरकारने घेतली आहे. याचा अर्थ आता संपूर्ण लसीकरण केंद्रामार्फतच राबवलं जाणार आहे.

21 जून, 2021 पासून 18+ सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून लसीकरणाबाबत एक गाइडलाइन तयार करणार आहे.

केंद्र सरकार स्वतः लस उत्पादक कंपन्यांकडून लस खरेदी करणार आणि राज्यांना मोफत देणार. राज्यांना लस खरेदी करायची गरज नाही, असं मोदींनी सांगतिलं.

शिवाय ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना ती घेता येईल पण तिथं पैसे आकारले जातील. खासगी रुग्णालयं 25 टक्के लस खरेदी करू शकतात.

पण खासगी रुग्णालयातील लसीकरण राज्य सरकारच्या देखरेखीतच चालेल. लशीच्या निश्चित किमतीच्या 150 रुपयांपर्यंतच सर्व्हिस चार्ज घेऊ शकतात, असं मोदींनी स्पष्ट केलं आहे.




