Home /News /coronavirus-latest-news /

'या' आजोबांवर कोरोनाचे 11 डोस घेतल्यामुळे FIR आहे दाखल, आता त्यांना हवाय बुस्टर डोस

'या' आजोबांवर कोरोनाचे 11 डोस घेतल्यामुळे FIR आहे दाखल, आता त्यांना हवाय बुस्टर डोस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा (Corona Vaccination) एकच डोस घेण्यास अनेकजण घाबरतात. बिहारमधील एका 84 वर्षीय आजोबांनी मात्र एक, दोन नव्हे तर आतापर्यंत तब्बल 11 वेळा ही लस घेतली आहे.

मधेपुरा, 20 जानेवारी: कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा (Corona Vaccination) एकच डोस घेण्यास अनेकजण घाबरतात. बिहारमधील एका 84 वर्षीय आजोबांनी मात्र एक, दोन नव्हे तर आतापर्यंत तब्बल 11 वेळा ही लस घेतली आहे. आता या आजोबांना लसीचा बूस्टर डोस (booster dose) घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केलेत. 84 वर्षीय ब्रह्मदेव मंडल (Brahmdeo Mandal) यांनी आतापर्यंत 11 वेळा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यांना आता बूस्टर डोस घ्यायचा आहे. मधेपुरा जिल्ह्यातील ब्रह्मदेव मंडल यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी 11 वेळा लस घेण्यासाठी वेगवेगळे आयडी वापरल्याबद्दल पुरैनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सीआरपीसीच्या कलम 41 नुसार घोषणापत्र सादर केल्यानंतर त्यांना अटकेपासून दिलासा मिळालाय. मंडल यांना अटक करण्यात येऊ नये, अशी मागणी आरजेडीचे आमदार चंद्रशेखर यांनी केली होती. त्यातच आता ब्रह्मदेव मंडल यांनी बूस्टर डोस देण्याची मागणी केली आहे. हे वाचा-'आता शाळा सुरू केल्या तर..', सरकारच्या निर्णयानंतर तज्ज्ञांनी सांगितला मोठा धोका ..तर, 24 वेळा लस घेईन ब्रह्मदेव मंडल यांनी बुधवारी (19 जानेवारी) पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितले की, 'मी लसीची परिणामकारकता पाहण्यासाठी बूस्टर डोसदेखील घेईन. जर त्याचा फायदा झाला तर मी 12 वेळा नव्हे तर 24 वेळा लस घेईल. पाठदुखीसह विविध आजारांपासून मुक्त होण्यासाठी मी अनेकदा लस घेतली आहे.' तर, यापूर्वी मधेपुरा येथे लसीकरणाबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंडल यांनी त्यांना लस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत असा दावा केला की 'अनेक आरोग्य कर्मचारी अकुशल आणि अप्रशिक्षित होते. ते त्यांना ठरवून दिलेली कार्यपद्धती नीट पाळत नव्हते. माझा दोष एवढाच होता की, मी प्रत्येक वेळी त्यांना मी यापूर्वी लस घेतली नाही, असे खोटे बोललो.' हे वाचा-सावधान! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची दिसतायत ही 5 लक्षणे 13 फेब्रुवारीला पहिल्यांदा घेतली होती लस प्रसार माध्यमांशी बोलताना, ब्रह्मदेव मंडल यांनी पुनरुच्चार केला की त्यांनी अनेक वेळा लसीचे डोस घेतले.' दरम्यान आरोग्य विभागाची दिशाभूल केल्याप्रकरणी पुरैनी पोलीस स्टेशन परिसरातील पुरैनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (PHC) प्रमुखांनी 7 जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीवरून ब्रह्मदेव मंडल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मंडल यांनी कोरोनाची पहिली लस गेल्या वर्षी 13 फेब्रुवारी घेतली होती. एकाच व्यक्तीने कोरोना प्रतिबंधात्मक लस तब्बल 11 वेळा घेतल्यामुळे बिहारच्या आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत असलेल्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं.
First published:

Tags: Corona, Corona vaccination

पुढील बातम्या