Home /News /coronavirus-latest-news /

Omicron: सावधान! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची दिसतायत ही 5 लक्षणे

Omicron: सावधान! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाची दिसतायत ही 5 लक्षणे

omicron

omicron

जग आता पूर्वीपेक्षा खूप मजबूत स्थितीत असून कोरोनाच्या या प्रकारांशी लढण्यासाठी सज्ज आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस मिळाली आहे. त्यामुळं लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे.

    नवी दिल्ली, 19 जानेवारी : कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron Corona) प्रकाराच्या संसर्गाची लक्षणं फार गंभीर मानली जात नाहीत. भारतासह अनेक देशांना या घातक प्रकाराचा सामना करावा लागत आहे. परंतु, हा प्रकार सर्व जुन्या प्रकारांच्या तुलनेत सर्वांधिक संक्रामक आहे. याशिवाय, कोरोनाचे दोन्ही (Fully Vaccinated) डोस घेतलेल्या लोकांमध्येही लक्षणं दिसून येतात. जग आता पूर्वीपेक्षा खूप मजबूत स्थितीत असून कोरोनाच्या या प्रकारांशी लढण्यासाठी सज्ज आहे. जगभरातील बहुतेक देशांमध्ये, लोकांना कोरोनावरील लस मिळाली आहे. त्यामुळं लोकांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात मजबूत झाली आहे. अशा परिस्थितीत डेल्टाच्या तुलनेत कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉन (Omicron) अत्यंत किरकोळ मानली जात आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या या प्रकाराची लागण झालेल्या लोकांमध्ये दिसणारी लक्षणंही सौम्य असतात, असं 'आज तक'च्या बातमीत म्हटलंय. कोविडचे वेळोवेळी येणारे नवीन प्रकार पाहता, कोरोना लक्षणांच्या प्रोफाइलमध्येही बदल करण्यात आले आहेत. न्यूजजीपीमधील प्रोफेसर टिम स्पेक्टर यांनी लिहिलंय की, जर आपण 2020 मध्ये आलेल्या अल्फा प्रकाराची लागण झाल्यानंतर त्याची खोकला, ताप आणि वास येणं कमी होणं अशी 3 लक्षणं खूप सामान्य होती. प्रोफेसर स्पेक्टर हे ZOE कोविड स्टडीचे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लाखो अॅप वापरकर्त्यांद्वारे साथीच्या आजारातील घडामोडींचा मागोवा घेतला आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट आला, तेव्हा आम्हाला त्याच्या लक्षणांमध्ये बदल दिसला. यामुळं अव्वल रँकिंगमध्ये असलेल्या 'अल्फा'ची लक्षणं दिसणं कमी होऊन डेल्टाची लक्षणं मोठ्या प्रमाणात दिसू लागली. नाक वाहणं, घसा खवखवणं आणि वारंवार शिंका येणं ही त्यांच्यात दिसणारी सामान्य लक्षणं आहेत. विशेषतः ही लक्षणं पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांमध्ये दिसून आली आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्यानं सध्या परिस्थिती वाईट झाली आहे. हे वाचा - Corona काळातील 7 Wonders! या देशांमध्ये नाही एकही Covid रुग्ण, पाहा PHOTOs कोरोनाच्या तिसर्‍या प्रकाराबद्दल पाहिलं तर डेल्टा व्हेरियंटचा ट्रेंड पुढे नेत असल्याचं दिसतं. स्पेक्टर यांनी स्पष्ट केलं की, ओमिक्रॉनची लक्षणं कोणत्याही सामान्य सर्दी-पडसं आणि तापासारखी असतात आणि ही लक्षणं पूर्णपणे लसीकरण झालेल्यांमध्ये दिसून येत आहेत. लंडनमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या लोकांमध्ये लक्षणं दिसल्यानंतरच प्रोफेसर स्पेक्टर आणि त्यांच्या टीमनं हा निष्कर्ष काढला. प्राथमिक विश्लेषणामध्ये डेल्टा आणि ओमिक्रॉन यांच्यातील सुरुवातीच्या लक्षणांमध्ये (चाचणीनंतर तीन दिवस) कोणताही स्पष्ट फरक आढळला नाही. हे वाचा - Hero इलेक्ट्रिक आणि महिंद्राचा मोठा करार; वर्षाला 10 लाख दुचाकी इलेक्ट्रिक गाड्यांची होणार निर्मिती कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकाराची ZOE अॅपमध्ये नमूद केलेली ही 5 लक्षणं आहेत. - नाक वाहणं - डोकेदुखी - थकवा (तीव्र किंवा सौम्य) - शिंकणे - घसा खवखवणे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Omicron

    पुढील बातम्या