बीजिंग, 06 जुलै : जगभरात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढत आहे. यातच आता चीनमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. रविवारी उत्तर चीनमधील एका शहरात ब्यूबॉनिक प्लेगच्या (Bubonic plague) संशयास्पद दोन घटना आढळल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चिनी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, सध्या दोन प्रकरणं नोंदवली गेली आहेत, हा आजार एका माणसाकडून दुसऱ्यापर्यंत लगेच पसरतो. यामुळेच शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनच्या अधिकृत माध्यम पीपल्स डेली ऑनलाइनच्या वृत्तानुसार, इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेश, बयन्नुर यांनी प्लेगच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तिसर्या टप्प्याचा इशारा दिला आहे. शनिवारी बयन्नुर येथील रूग्णालयात ब्यूबॉनिक प्लेगच्या संशयास्पद दोन घटना उघडकीस आल्या. स्थानिक आरोग्य विभागाने घोषणा केली की हा अलर्ट 2020 अखेरपर्यंत असेल. स्थानिक आरोग्य विभागानं अशी माहिती दिली की, सध्या या शहरात मानवी प्लेगच्या साथीचा धोका आहे. जनतेने आत्मरक्षासाठी जागरूकता आणि क्षमता वाढविली पाहिजे आणि आरोग्यास असामान्य स्थितीबद्दल त्वरित माहिती द्यावी. वाचा- भारताची ‘कोरोना लस’ केव्हा येणार? वादावर सरकारनेच खोडला ICMRचा हा दावा बीजिंगमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या आकड्यात आता घट झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत केवळ 8 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर चिनी अधिकाऱ्यांनी आकडेवारीत घट झाल्याचे सांगितले. गेल्या सात दिवसांपासून देशाच्या राजधानीत 10 पेक्षा कमी प्रकरणं नोंदवली गेली आहेत. शहरात तीन आठवड्यांपूर्वी कोरोनाबाधितांचा आकडा हा 334 होता. मार्चमध्ये देशातील सर्वात जास्त संक्रमणाची घटना घडली आहे. बीजिंग सरकारचे प्रवक्ते शु हेजियान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की परिस्थिती नियंत्रणात असून ती सतत सुधारत आहे. चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 83 हजार 553 असून यातील 4634 लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा- कोरोनाचा नवा हॉटस्पॉट! एका पॉझिटिव्हमुळे 27 जणांना जडला संसर्ग संपादन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.