मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

पाण्याच्या बॉटल पेक्षाही कमी दरात मिळणार COVAXIN लस! जगातली सर्वात स्वस्त वॅक्सिन देण्याचा मानस

पाण्याच्या बॉटल पेक्षाही कमी दरात मिळणार COVAXIN लस! जगातली सर्वात स्वस्त वॅक्सिन देण्याचा मानस

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

भारत बायोटेकच्या वतीने कोवाक्सिन (COVAXIN) ही लस तयार केली जाणार आहे. ही लस सध्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
तेलंगणा, 05 ऑगस्ट: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दुसरीकडे जगभरातील सर्वच देश कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातही यात मागे नाही आहे. भारतात कोरोनाची लस तयार करण्याचं काम भारत बायोटेक या कंपनीकडून सुरू आहे. भारत बायोटेकच्या वतीने कोवाक्सिन (COVAXIN) ही लस तयार केली जाणार आहे. ही लस सध्या मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहे. या चाचणीचा दुसरा टप्पा सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान ही लस पाण्याच्या बॉटेलपेक्षाही कमी किंमतीत देण्याचे आमचे मानस असल्याचे भारत बायोटेक कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. तेलंगणाचे मंत्री के तारका यांनी भारत बायोटेक कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना लशीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. यावेळी कंपनीचे संचालक कृष्णा एला यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. जागतिक आरोग्य संघटना कोवाक्सिनला पाठिंबा देत आहे. ही लस कमीत कमी किंमतीत लोकांपर्यंत पोहचवावी, हे आमचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी कृष्णा एला म्हणाले. वाचा-बापरे! कोरोना रुग्णांना नेण्यासाठी अ‍ॅम्बुलन्सच नाही, 12 तासांपासून 5 रुग्ण घरात दरम्यान कोवाक्सिन लस कधीपर्यंत बाजारात उपलब्ध होईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही आहे. मात्र या लसीचे आतापर्यंत झालेल्या तपासणीत चांगले रिपोर्ट आले आहेत. या लसीचा प्रयोग स्वयंसेवकांवर करण्यात आला आहे. याचे परिणाम चांगले दिसून आले आहेत. वाचा-GOOD NEWS! रशियात कोरोनाची लस तयार; पुढील महिन्यापासून उत्पादन होणार सुरू स्वयंसेवकांच्या शरीरात दिसून आली वेगळीच लक्षणं दिल्लीतील ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) येथे भारताच्या संभाव्य लस कोवॅक्सिनची (Covaxin) मानवी चाचणी दोन आठवड्यांपूर्वी सुरू झाली होती, मात्र आता एक समस्या समोर आली आहे. कोवॅक्सिनच्या या क्लिनिकल मानवी चाचणीत भाग घेणारे 20 टक्के व्हॉलेंटिअरच्या शरीरात कोरोनाविरूद्ध अॅंटिबॉडिज आधीच अस्तित्वात असल्याचे दिसून आले. असे व्हॉलेंटिअर ट्रायलसाठी योग्य नाहीत. त्यांचे प्रमाण दर पाच व्हॉलेंटिअरपैकी एक आहे. त्यामुळे येथील स्वयंसेवकांचा रिजेक्शन रेट जास्त आहे. वाचा-Covaxin लशीची मानवी चाचणी अडचणीत, व्हॉलेंटिअरच्या शरीरात दिसून आली वेगळीच लक्षणं रिजेक्शन रेट जास्त एम्समधील Covaxinच्या मानवी चाचण्यांचा अभ्यास केलेल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रिजेक्शन रेटचे प्रमाण बरेच जास्त आहे. 20 टक्के व्हॉलेंटिअरच्या शरीरात कोरोनाविरूद्ध अॅंटिबॉडिज आधीच अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्यावर चाचणी केली जाऊ शकत नाही. याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीस आधीच कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि आता तो बरा झाला आहे. अशा परिस्थितीत या स्वयंसेवकांमध्ये लसीचा परिणाम दिसणे कठीण आहे. स्वदेशी लस Covaxinच्या मानवी चाचणीसाठी 3500 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. 24 जुलै रोजी Covaxinचा पहिली डोस 30 वर्षीय व्यक्तीला देण्यात आला. पहिल्या आठवड्यात या व्यक्तीमध्ये साइड इफेक्ट दिसून आले नाहीत. आता डॉक्टर त्याच्याकडे अधिक लक्ष ठेवून आहेत.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india

पुढील बातम्या