गुहागरमध्ये 04 ऑगस्ट: गुहागरमध्ये प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणणारी घटना उघडकीस आली आहे. सरकारी अॅम्बुलन्स नादुरुस्त झाली असल्याचे कारण देत कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या 5 रुग्णांना घरातच आयसोलेट व्हा असे सांगण्याची वेळ आलीय. गुहागरमध्ये आज सकाळी 5 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरातून कुठेही जाऊ नका, तुम्हाला न्यायला सरकारी अॅम्बुलन्स येणार असल्याचे सांगण्यात आले मात्र रात्र झाली तरीही गाडी आली नाही आणि त्यानंतर कोविड पॉझिटिव्ह आलेल्या नातेवाइकांनी धावपळ सुरू केली.
मात्र गाडी आज दुरुस्त होणार नाही, उद्या सकाळी होईल असे सांगत तुम्हाला घरातल्या घरी आयसोलेट व्हावे लागेल असे सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 2 रुग्ण हे गुजगरमधील कुंभारवाडीतले आहेत तर उर्वरित 3 जण हे गुहागर मोहल्ला येथे राहतात.
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांपासून इतर कोणालाही संसर्ग होऊ नयेत त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू व्हावेत यासाठी खरंतर कोविड सेंटर तयार करण्यात आलेत मात्र 12 तास उलटून देखील प्रशासनाने काहीच हालचाल न केल्यामुळे गुहागरमधील 5 जणांना मंगळवारची रात्र घरात काढण्याची वेळ आली आहे.
‘हिट विकेट म्हणतात याला’; आदित्य ठाकरेंच्या पोस्टनंतर नितेश राणेंची शेरेबाजी
आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की गाडी नाही म्हणून आज संशयित रुग्णांचे swab देखील घेतले गेलेले नाहीत, ही माहिती आरोग्य विभागाचे डॉक्टर देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा उच्चांक झाला आहे. पहिल्यांदाच तब्बल 12,323 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. आजपर्यंत राज्यात एकूण दोन लाख 99 हजार 356 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.37 टक्के एवढे आहे. राज्यात आज 7760 नवीन रुग्ण सापडले. राज्यात आज तीनशे रुग्णांचा मृत्यू सध्या राज्यातील मृत्यूदर 3. 52 टक्के एवढा झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 57 हजार 956 एवढी झाली आहे.
UPSC: पंढरपूरची उंच भरारी, एकाच दमात तालुक्यातून झाले IAS आणि IPS अधिकारी
राज्यात नऊ लाख 44 हजार 442 व्यक्ती घरात विलगीकरण आत आहेत तर 43 हजार 906 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरण यात आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले. गेल्या 24 तासांत 52 हजार 050 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 803 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 55 हजार 746 झाली आहे. यात 5 लाख 86 हजार 298 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 12 लाख 30 हजारहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus