Home /News /coronavirus-latest-news /

हृदयद्रावक! पतीला वाचवण्यासाठी त्या मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पण कोरोनानं हिरावलं सौभाग्य

हृदयद्रावक! पतीला वाचवण्यासाठी त्या मॅरेथॉनमध्ये अनवाणी धावल्या, पण कोरोनानं हिरावलं सौभाग्य

2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत लता करे यांनी पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. येथील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना अखेर मंगळवारी (दि. 4) रात्री त्यांच्या पतीचे निधन झाले.

पुढे वाचा ...
पुणे, 07 मे: बारामती (Baramati Corona update) येथील 72 वर्षीय मॅरेथॉनपटू लता करे (Lata Kare) यांचे पती भगवान करे यांचे मंगळवारी (दि. 4) कोरोनाने निधन झाले. 2013 मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत लता करे यांनी पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. येथील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना अखेर मंगळवारी (दि.४) रात्री त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे पतीला वाचविण्यासाठीची करे यांची धाव आता कायमची थांबली आहे. 2013 मध्ये लता करे या पतीच्या हृदयविकारावरील उपचाराला लागणारे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावल्या. पतीच्या उपचारासाठी वयाच्या 64व्या वर्षी धावणाऱ्या लता करे यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र त्यांचे कौतुक झाले. त्यानंतर सलग तीन वर्षे त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत हॅट्रीक साधली. तिसऱ्या वर्षी त्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावल्या होत्या. हृदयविकारातून पतीला वाचवलं, पण कोरोनानं नेलं करे यांच्या तिन्ही मुलींचे विवाह झाल्यावर हे कुटुंब सुमारे 9 वर्षांपूर्वी बारामतीत वास्तव्यास आले आहे. बुलढाणा येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने बारामतीत स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांचा मुलगा एका कंपनीत चौकीदाराची नोकरी करतो, हे कुटुंंब एका भाड्याच्या खोतील वास्तव्यास आहे. हे वाचा- सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा! शिवसेनेचे मंत्री विकास कामांच्या उद्घाटनात व्यस्त पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील काढण्यात आला आहे. 'लता भगवान करे, एक संघर्षकथा’ (lata kare Movie) असे या चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती. हे वाचा -भारतीय क्रिकेटपटूच्या घरी कोरोनाचा कहर! आईनंतर बहिणीचंही निधन दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर नवीन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मार्च 2021 मध्ये जाहीर झाला आहे. लता करे यांच्यावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ (Lata Bhagwan Kare) या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Corona updates, Coronavirus, बारामती

पुढील बातम्या