बंगळुरु, 7 मे : देशात वाढलेल्या कोरोनाचा (Covid-19) फटका क्रिकेट विश्वालाही बसला आहे. राजस्थानचा क्रिकेटपटू विवेक यादव (Vivek Yadav) याचं वयाच्या 36 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झालं. त्यापाठोपाठ महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती **(**Veda Krishnamurthy) हीचं देखील कोरोनामुळे कधीही न भरुन येणारं नुकसान झालं आहे. वेदाच्या आई चेलुवम्बदा देवी यांचं कोरोनामुळे दोन आठवड्यांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर तिची मोठी बहीण वत्सला शिवकुमार यांचं देखील कोरोनामुळे निधन झालं आहे. 45 वर्षाांच्या वत्सला गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाशी झुंज देत होत्या, त्यांची ही झूंज दुर्दैवानं अपयशी ठरली. चिक्कमंगळूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. वेदा कृष्णमूर्तीनं ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. “मला हे अत्यंत दु:खानं सांगावं लागत आहे की, काल रात्री माझ्या परिवाराला अक्काला अलविदा करावं लागलं. या घटनेचा मला मोठा धक्का बसला आहे. तुमचे मेसेज आणि प्रार्थनाचा मी आदर करते. आपल्या प्रिय व्यक्तींसोबत सुरक्षित राहा.” या शब्दात वेदानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
It is with great sadness that last night my family had to say goodbye to My Akka My family, my world has been rocked to its core. Appreciate all the messages and prayers . My thoughts with everyone going through these devastating times. Hold your loved ones tight and stay safe 🙏
— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) May 6, 2021
धक्कादायक! भारतीय क्रिकेटपटूचे 36 व्या वर्षीच कोरोनामुळे निधन वेदानं 48 वन-डे मध्ये 829 रन केले असून 3 विकेट्स देखील घेतल्या आहेत. या प्रकारात तिच्या नावावर 8 अर्धशतक आहेत. तसेच 76 टी 20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये 2 अर्धशतकासह 875 रन केले आहेत. वेदा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक टीमची सदस्य आहे