जाहिरात
मराठी बातम्या / देश / नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे, नियमांच्यावर पंतप्रधानसुद्धा नाही - PM मोदी

नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे, नियमांच्यावर पंतप्रधानसुद्धा नाही - PM मोदी

नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे, नियमांच्यावर पंतप्रधानसुद्धा नाही - PM मोदी

गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा केले गेले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 जून : नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना मोफत धान्य दिलं जाणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यात मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता गेल्याने एका देशातील पंतप्रधानांना 13000 रुपयांचा दंड द्यावा लागला होता. सध्या कोरोनाच्या काळात नियमांची कडक अंमलबजावणी करावयास हवी. पंतप्रधानसुद्धा या नियमांच्यावर नाही, असे मोदी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी व छठ पुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत केला जाईल. 80 कोटी जनतेला मोफत अन्न देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील पाच महिने देणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. याशिवाय वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनलॉक सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाच्या काळात जनतेला सुविधा पोहोचविणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -वेळीच लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर -अनलॉकमध्ये वैयक्तिक व सोशल डिस्टन्सिंगवर दुर्लक्ष केलं जात आहे. ही चिंतेची बाब आहे. -लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. अनलॉकमध्येही देशातील नागरिक, संस्थांनी पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज आहे. PM Modi Speech Live -कंटेन्टमेंट झोनमध्ये अधिक काळजी घ्यायला हवी. -भारतातही स्थानिक सरकारला अधिक काळजी घ्यायला हवी. भारतात गावाचा प्रधान असो की नगरसेवक सर्वांनी काळजी घ्यायला हवी. हे वाचा- भारतात 59 चिनी अॅप्सवरील बंदीनंतर पहिल्यांदा चीनने दिली प्रतिक्रिया -लाखो लोकांचे प्राण लॉकडाऊनच्या नियमांमुळे वाचले. नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना रोखायला हवं, टोकायला हवं आणि समजवायला हवं. स्थानिक प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमाच्या वर पंतप्रधानसुद्धा नाही. -गेल्या तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा केले गेले. -प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार नोव्हेंबरअखेरपर्यंत करण्याचा विचार आहे. दिवाळी, छठपूजा होईपर्यंत मोफत धान्य मिळेल. दर महिन्याला प्रत्येक गरीब कुटुंबातल्या सदस्यांना प्रत्येकी पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ मिळेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात