नवी दिल्ली, 09 डिसेंबर : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) हळूहळू आटोक्यात येऊ लागलेली असतानाच सर्वत्र तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात होती. सुदैवाने ती लाट आली नाही; मात्र कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवलीच. एक-दोन करता करता भारतात सापडलेल्या ओमिक्रॉनबाधितांची (Omicron) संख्या 23 वर पोहोचली आहे. आता या रुग्णांमध्ये असं काही दिसून आलं ज्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. भारतात सापडलेल्या बहुतेक ओमिक्रॉन रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाही आहेत आणि ही धोक्याची घंटा आहे (Asymptomatic omicron cases in india).
ओमिक्रॉन व्हॅरिएंटचा (Omicron Variant) संसर्ग झालेल्या रुग्णांना सौम्य लक्षणं दिसत असल्यामुळे तज्ज्ञांना दुसऱ्याच एका चिंतेने घेरलं आहे. लक्षणं कमी दिसली, की टेस्ट करण्याचं प्रमाण कमी होतं. तसंच, अशा व्यक्ती विलगीकरणातही राहत नाहीत. काही जणांना तर आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे गंभीर लक्षणं दर्शवणाऱ्या स्ट्रेनच्या तुलनेत सौम्य लक्षणं असलेल्या स्ट्रेनचा संसर्ग वेगाने पसरू शकतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
आज तकच्या वृत्तानुसार दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर सुरेश कुमार यांनी सांगितलं, 'ओमिक्रॉनच्या एका रुग्णामध्ये नाक गळणं आणि घशात खवखव याव्यतिरिक्त अन्य कोणतंही लक्षण दिसलेलं नाही. ओमिक्रॉनचे बहुतांश रुग्ण असिम्प्टमॅटिक (Asymptomatic) म्हणजेच कोणतीही लक्षणं नसलेले आहेत. विमानतळावरून येणाऱ्यांसाठी आमच्याकडे 50 आयसोलेटेड बेड्सची व्यवस्था आहे. त्याशिवाय रामलीला मैदानात 500 आयसीयू कोविड बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.'
हे वाचा - Omicron : राज्यातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाबाबत दिलासादायक माहिती
राजस्थानात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले नऊ रुग्ण आढळले असून, सर्वांना कोणतीही लक्षणं दिसत नााहीयेत. जयपूरचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. नरोत्तम शर्मा यांनी सांगितलं, 'आम्हाला कोविडचे 11 नवे रुग्ण आढळले असून, ते ओमिक्रॉनबाधित परिवारांमधले आहेत किंवा जर्मनीमधून आलेले आहेत. त्यांची सॅम्पल्स जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आली आहेत. ज्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे, त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत.'
एकंदरीतच, लक्षणं सौम्य असली तरी दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्यामुळे बाकीच्या व्यक्तींना कोरोनाचा किंवा ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ शकतो, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.
हे वाचा - आता लहान मुलांना विळख्यात घेतोय कोरोना; आठवडाभरात झालेली स्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. त्याचा रिपोर्ट आता निगेटिव्ह आला असून, त्याला घरी सोडण्यात आलं आहे. 33 वर्षांच्या या मेकॅनिकल इंजिनीअरला आता घरी सात दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असं कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus