मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसारामला कोरोनाची लागण, प्रकृती खालावल्यानं ICU मध्ये दाखल

बलात्कारप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसारामला कोरोनाची लागण, प्रकृती खालावल्यानं ICU मध्ये दाखल

राजस्थान जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या आसारामला (Asaram) कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात (Mahatma Gandhi Hospital) दाखल करण्यात आलं आहे.

  • Published by:  Kiran Pharate
जोधपूर 06 मे : राजस्थान जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या आसारामला (Asaram) कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर बुधवारी रात्री प्रकृती बिघडल्यानं त्याला महात्मा गांधी रुग्णालयात (Mahatma Gandhi Hospital) दाखल करण्यात आलं आहे. आसारामची तीन दिवसाआधीच कोरोना चाचणी केली गेली होती आणि बुधवारी संध्याकाळी रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला होता. यानंतर 80 वर्षीय आसारामनं तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं होतं. कोरोनामुळे ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानं त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. आसारामची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समजताच अनेक समर्थकांनी रुग्णालयात धाव घेतली. इतकंच नाही तर प्रकृती खालावत असल्यानं आसारामला आता जोधपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्याची तयारी सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये जोधपूर सेंट्रल जेलमधील अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर सर्व कैद्यांना आयसोलेट केलं गेलं आहे. याच दरम्यान इतर कैद्यांमध्येही कोरोनाचे लक्षण दिसण्यास सुरुवात झाल्यानंतर आसारामचे सँपल चाचणीसाठी पाठवण्यात आले. यानंतर बुधवारी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आसारामची प्रकृती बिघडली. आसारामला रुग्णालयात दाखल करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात प्रकृती अचानक बिघडल्यानं आसारामला अतिदक्षात विभागात दाखल करण्यात आलं होतं. VIDEO: कर्तव्यावर निघालेल्या डॉक्टरलाच पोलिसांकडून अमानुष मारहाण झाल्याचा दावा बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा - आसुमम थाउमल हरपलानी उर्फ आसारामला अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतकंच नाही, तर आसारामवर नरबळी आणि हत्येसारखे अनेक गंभीर आरोपही आहेत. एक काळ असा होता, जेव्हा आसारामच्या दरबारामध्ये देशातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावायचे. मात्र, 2013 मध्ये बलात्कारप्रकरणात अडकल्यानंतर आसारामचे वाईट दिवस सुरू झाले. तेव्हापासून आसाराम जेलमध्ये बंद आहे.
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus, Criminal

पुढील बातम्या