जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / ओमायक्रॉन व्हेरिएंट करणार कोरोना महामारीचा शेवट? एक्सपर्ट्सने दिलं दिलासादायक उत्तर

ओमायक्रॉन व्हेरिएंट करणार कोरोना महामारीचा शेवट? एक्सपर्ट्सने दिलं दिलासादायक उत्तर

दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटशी संबंधित प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली. यानंतर प्रकरणं शिखरावर पोहोचली आणि आता प्रकरणांमध्ये मोठी घट झाली

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 जानेवारी : देशात आणि जगभरातच ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. दररोज कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) नवे रेकॉर्ड बनवत आहे. अशात आता महामारीबाबत हे नवीन वर्ष 2022 कसं असणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यात दिलासादायक बाब ही आहे, की कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट लोकांना अधिक नुकसान पोहोचवत नसून याची हलकी लक्षणं दिसत आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी असल्याने ही दिलासादायक बाब आहे. हा व्हेरिएंट श्वसनमार्गावर परिणाम करतो , मात्र फुफ्फुसांना नुकसान पोहोचवत नाही. त्यामुळे लोकांना ऑक्सिजन सपोर्ट (Oxygen Support) आणि आयसीयूमध्ये दाखल करण्याची गरज नाही. परंतु ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला असून त्यामुळे रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली आहे. दिल्लीतील कोविड टास्क फोर्सशी संबंधित डॉ. शमशेर द्विवेदी म्हणाले की, ओमायक्रॉन प्रकारामुळे रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच संसर्ग झाल्यामुळे रुग्णांची काळजी घेणं मोठं आव्हान बनलं आहे. डेल्टा, ओमिक्रॉननंतर आता डेल्टाक्रॉन; नेमका काय आहे कोरोनाचा हा नवा प्रकार? दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंटशी संबंधित प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली. यानंतर प्रकरणं शिखरावर पोहोचली आणि आता प्रकरणांमध्ये मोठी घट झाली. यावरून हे स्पष्ट होतं, की ओमायक्रॉन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसतात, त्यामुळे पुढे काय होईल याचं विश्लेषण करण्याची गरज आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील महामारी विशेषतज्ञ डॉ मोनिका गांधी म्हणाल्या की होय, ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या मदतीने ही महामारी संपेल असं चित्र दिसत आहे. त्या म्हणाल्या, की हा प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे, ज्यामुळे लस घेतल्यानंतरही लोकांना पुन्हा संसर्ग होत आहे. मात्र, लस न घेणाऱ्या लोकांवरही ओमायक्रॉन व्हेरिएंटचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. कारण ते फुफ्फुसाच्या पेशींना संक्रमित करू शकत नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शेवट कधी? राजेश टोपेंनी दिली दिलासादायक माहिती अनेक अभ्यासांतून हे समोर आलं आहे. ओमायक्रॉन प्रकारामुळे होणारे संक्रमण लोकांची प्रतिकारशक्ती वाढवेल आणि भविष्यात येऊ शकणार्‍या इतर प्रकारांशी लढण्यासाठीदेखील मदत करेल. डॉ मोनिका गांधी म्हणाल्या, की आम्हाला वाटतं की ओमायक्रॉन प्रकार आपल्याला या महामारीतून बाहेर काढेल आणि या महामारीचा शेवट होईल. परंतु प्रत्येक डॉक्टर या गोष्टीशी सहमत नाही. पुण्यातील इम्युनोलॉजिस्ट डॉ. विनिता बल यांनी सांगितले की, जोपर्यंत कोरोना विषाणूशी लढा देण्याची प्रतिकारशक्ती मोठ्या लोकसंख्येमध्ये विकसित होत नाही, तोपर्यंत हा विषाणू आपल्यामध्ये राहणार आहे. जगभरातील मुलांना अद्याप लस मिळालेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही साथ संपेल, असं म्हणणं घाईचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात