• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • #InThisTogether: कोव्हिडग्रस्तांसाठी विरुष्काचा मदतीचा हात, उभारणार 7 कोटींचा निधी

#InThisTogether: कोव्हिडग्रस्तांसाठी विरुष्काचा मदतीचा हात, उभारणार 7 कोटींचा निधी

भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दाम्पत्याने भारतातल्या कोव्हिड मदतकार्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी उभारण्याची (Fundraiser Campaign) घोषणा केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 07 मे: भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Corona Second Wave) युद्ध करतो आहे. अनेकांना याचा फटका बसला आहे, तसंच मदतीसाठी पुढे येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सर्वसामान्य नागरिकही आपल्याला जमेल तेवढी मदत करत आहेत. अनेक सेलेब्रिटींनीही सढळ हस्ते मदत केली आहे. त्यात आता भर पडली आहे ती भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या दाम्पत्याची. त्यांनी भारतातल्या कोव्हिड मदतकार्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी उभारण्याची (Fundraiser Campaign) घोषणा केली आहे. केट्टो डॉट ओआरजी (ketto.org) या क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवरून#InThisTogether या नावाने हा निधीउभारण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे. त्यातला दोन कोटी रुपयांचा निधी हे दाम्पत्य स्वतः देणार आहे. आजच अनुष्का शर्माने स्वतः इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या उपक्रमाची माहिती दिली आहे. #InThisTogether हा उपक्रम Ketto वर सात दिवस चालवला जाणार आहे. https://www.ketto.org/fundraiser/inthistogether या लिंकवर त्याची माहिती उपलब्ध असून, त्या लिंकवरूनच निधी दानही करता येऊ शकेल. या उपक्रमात आतापर्यंत विराट-अनुष्काच्या दोन कोटींव्यतिरिक्त 42 लाखांहून अधिक रक्कम अवघ्या काही तासांत जमा झाली आहे. या उपक्रमातून जमा झालेला निधी ACT Grants या संस्थेकडे दिला जाणार आहे. ही संस्था या उपक्रमाची इम्प्लिमेंटेशन पार्टनर (Implementation Partner) म्हणून काम करणार आहे. ही संस्था ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्धता, लसीकरण जनजागृती, टेलिमेडिसीन फॅसिलिटीज आदी प्रकारचं कार्य करत आहे. विराट-अनुष्काच्या उपक्रमातून गोळा झालेला निधी या संस्थेच्या कार्यासाठी दिला जाणार आहे. हे वाचा-IPL 2021: आयपीएल स्थगित होताच विराट कोहलीचा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार यावेळी अनुष्का शर्मा (Anushka Sharma)म्हणाली, 'भारतसध्या अत्यंत बिकट काळातून जातो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात संकट निर्माण झालं आहे. ही वेळ आहे आपण सर्वांनी एकत्र यायची आणि ज्यांना मदतीची खूप गरज आहे, त्यांना मदत करण्याची. लोकांना ज्या परिस्थितीतून जावं लागतं आहे,ते पाहून विराट आणि मला अतिशय दुःख होत आहे. आपण सगळे त्या परिस्थितीकडे हतबलपणे पाहत आहोत. या स्थितीत सुरू असलेल्या युद्धात हा निधी साह्यभूत होईल. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही प्रार्थना करतो.आमच्या या प्रार्थनेत तुम्हीही सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त जीव वाचवण्यास मदत करावी,असं आवाहन करते. कारण या परिस्थितीत आपण सगळे एकत्र आहोत. हे वाचा-असा हवा कॅप्टन! कोरोना संकटात महेंद्रसिंह धोनीचा निर्णय वाचून वाटेल अभिमान विराट कोहलीने म्हणाला की, 'इतिहासातल्या सर्वांत कठीण आणि अनपेक्षित काळातून देश सध्या जातो आहे. म्हणूनच जास्तीत जास्त जीव वाचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. गेल्यावर्षीपासून देशवासीयांना होत असलेल्या वेदना पाहून मला आणि अनुष्काला धक्का बसला आहे. महामारीच्या सगळ्या काळात शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता भारताला पूर्वीपेक्षाही जास्त मदतीची गरज आहे. म्हणूनच अत्यंत गरज असलेल्या व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उभा करण्यात यश मिळेल, असा विश्वास ठेवून आम्ही हा फंडरेझर उपक्रम सुरू केला आहे. संकटात असलेल्या देशवासीयांना मदत करण्यासाठी नागरिक पुढे येतील असा विश्वास आहे. आपण सगळे एकत्र आहोत आणि या परिस्थितीवर नक्कीच मात करू.'
ACT Grants या स्टार्टअप संस्थेच्या प्रवक्त्या गायत्री यादव (Gayatri Yadav) यांनी याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. 'आरोग्ययंत्रणेला ऑक्सिजनच्या पुरवठ्यात मदत करणं, तसंच महत्त्वाच्या वैद्यकीयगरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी आम्ही काम करतो आहोत.अनुष्का आणि विराट यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तींचं पाठबळ लाभल्यामुळेनिधी उभारण्याचं उद्दिष्ट साध्य होण्यास मोठी मदत होईल. या मोहिमेत हेदिग्गज सहभागी झाल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,'असं त्या म्हणाल्या.
First published: