मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: आयपीएल स्थगित होताच विराट कोहलीचा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार

IPL 2021: आयपीएल स्थगित होताच विराट कोहलीचा कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) स्थगित झाला आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होताच टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) कोरोनाग्रस्तांच्या (Covid-19) मदत कार्यात उतरला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 6 मे: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) स्थगित झाला आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होताच टीम इंडिया आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) कोरोनाग्रस्तांच्या (Covid-19) मदत कार्यात उतरला आहे. विराटनं यापूर्वी देखील Covid-19 महामारीच्या काळात खबरादारी घेण्याचं आवाहन केलं आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्यानंतर विराट मंगळवारी मुंबईत दाखल झाला. त्यानंतर लगेच तो मदतकार्यात सहभागी झाला. विराट कोहलीनं युवा सेनेचा कार्यकर्ते राहुल कनल (Rahul N. Kanal) यांची भेट घेतली. या संकटाच्या प्रसंगात मदत करण्याच्या उद्देशानं विराट राहुल यांना भेटला. राहुल कनल यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. " कॅप्टन विराट कोहलीनं आयपीएल 2021 अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. असं राहुल यांनी सांगितलं. "आपल्या कॅप्टनची भेट. त्यानं सुरु केलेल्या प्रयत्नांसाठी कोणतेही शब्द नाही. फक्त आदर आणि प्रार्थना आहे." असं ट्विट त्यांनी केलं आहे. यापूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिनं देखील 1 मे रोजी वाढदिवस साजरा केला नव्हता. अनुष्कानं या निमित्तानं सोशल मीडियावर व्हिडीओ (Video) शेअर केला होता. सध्या देश संकटाचा सामना करत असताना वाढदिवस साजरा करणं योग्य नाही, अशी भावना अनुष्कानं या व्हिडीओमध्ये व्यक्त केली होती. त्याचबरोबर विराट कोहलीसह आपण या विषयावर काम करत असून लवकरच याबाबतीत माहिती देणार असल्याचं सांगितलं होतं.
  पठाण बंधूही करणार मदत भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान (Irfan Pathan) आणि युसूफ पठाण (Yusuf Pathan) हे पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीला धावले आहेत. पठाण बंधूंची ऍकेडमी दक्षिण दिल्लीमधल्या कोरोना प्रभावित लोकांना मोफत जेवण देणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्ली ही सगळ्यात प्रभावित शहरांपैकी एक शहर आहे. '....मी तेव्हा आईसमोर रडत होतो,' चेतेश्वर पुजारानं सांगितला 'तो' अनुभव 'देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. गरजूंना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे, त्यामुळे क्रिकेट ऍकेडमी ऑफ पठाण दक्षिण दिल्लीमध्ये गरजूंना मोफत जेवण देईल,' असं इरफाननं सांगितलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Anushka sharma, Covid-19, Cricket, IPL 2021, Sports, Virat kohli

  पुढील बातम्या