न्यूयॉर्क, 23 ऑगस्ट : काही प्राण्यांना कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाल्याची प्रकरणं समोर आली होती. यामुळे कुत्रा, मांजर आणि वाघाचाही समावेश होता. कोरोनाव्हायरस हा वटवाघळामार्फत पसरला असल्याचं सांगितलं जातं आहे. आता तो माणसांमार्फत माणसांमध्ये पसरतो आहे. दरम्यान माणसांप्रमाणेच कोरोनाचा धोका काही प्राण्यांनाही आहे.
कोणत्या प्राण्यांना कोरोनाचा किती धोका आहे हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाने हा अभ्यास केला.
गोरिला,ओरंगुटन्स, गिबन्स ही माकडं तसंच ग्रे व्हेल आणि बॉटलनोझ डॉल्फिन, चायनीझ हॅमस्टर्स (चीनमध्ये आढळणारा उंदीर) यांनाही कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका माणसांइतकाच आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. मांजर, गुरंढोरं, मेंढ्या यांना कोरोनाचा मध्यम स्वरूपाचा धोका आहे, तर कुत्रा, घोडा, डुक्कर यांना कोरोनाचा कमी धोका असल्याचं दिसून आलं आहे.
हे वाचा - कोरोनाव्हायरसचा घेतला धसका; घाबरून आता शवपेटीतच झोपू लागलेत लोक
कोरोनाव्हायरस हा मानवी शरीरातील ACE2 या प्रोटिनमार्फत मानवी पेशीत प्रवेश करतो. ACE2 नाक, तोंड, फुफ्फुसातील वेगवेगळ्या पेशी आणि टिश्यूंमध्ये असतं. मानवी पेशीत ACE2 प्रोटिनमधील 25 अमिनो अॅसिड कोरोनाव्हायरसला मानवी पेशीत प्रवेश करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.
संशोधकांनी मानवी शरीरातील या 25 अमिनो अॅसिडपैकी किती अमिनो अॅसिड विविध प्राण्यांच्या ACE2 मध्ये सापडतात हे तपासलं.
ज्या प्राण्यांच्या शरीरात ACE2 मध्ये हे मानवी शरीरातील ACE2 तील 25 अमिनो अॅसिड होते, त्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. तर ज्या प्राण्यांमध्ये ACE2 मधील अवशेष मानवी शरीरातील ACE2 पेक्षा वेगळे आहेत. त्यांना कोरोनाचा धोका कमी आहे, असं संशोधनाचे अभ्यास जोआना डॅमॅस म्हणाले.
हे वाचा - "एका फोनमुळे मला बळ मिळतं", कोरोना वॉरिअर केरळच्या आरोग्यमंत्र्यांचा एक दिवस
वटवाघळामार्फत हा आजार पसरल्याचं सांगितलं जातं. मात्र वटवाघळामार्फत माणसांमध्ये किंवा इतर माध्यमातून हा आजार माणसांपर्यंत पोहोचला हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र या अभ्यासातून एक किंवा अधिक माध्यमातून आजार पसरला असू शकते, याला आधार मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.