टोकिया, 23 ऑगस्ट : कोरोनाव्हायरसची (coronavirus) दहशत जगभरात आहे. या व्हायरसमुळे प्रत्येकाच्या मनात भीतीने घर केलेलं आहे. भीती दूर करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जात आहेत. जपानमध्ये (japan) तर लोक आता कोरोनाव्हायरसला घाबरून शवपेटीतच झोपू लागले आहे. ऐकून आश्चर्य वाटलं असेल. मात्र कोरोनाची भीती दूर करण्यासाठी जपानमध्ये एका कंपनीने हा मार्ग शोधला आहे.
जपानच्या एका कंपनीने लोकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी एक आगळावेगळा शो आयोजित केला आहे. स्केअर स्क्वाड असं या शोचं नाव असून हा 15 मिनिटांचा शो आहे. यामध्ये दोन मीटर लांबीच्या एका बॉक्समध्ये जिवंत माणसांना एखाद्या मृतदेहाप्रमाणे शवपेटीत झोपवलं जातं. त्यांना भीतीदायक अशा गोष्टी ऐकवल्या जातात. शवपेटीत झोपून तुम्हाला अभिनेत्यांना अभिनय करताना पाहू शकता. काही नकली हातांचा तुम्हाला स्पर्श होऊ शकतो किंवा तुमच्यावर पाण्याचा फवाराही येऊ शकतो.
प्रोडक्शन कंपनी कोवागसेटाईचे कोऑर्डिनेटर केंटा इवाना यांनी सांगितलं, "स्केअर स्क्वाड या 15 मिनिटांच्या शोमुळे कोरोनाव्हायरच्या महासाथीत तणावपूर्ण अशी परिस्थिती आहे. लोकांना मोठ्याने ओरडण्याची संधी मिळते ज्यामुळे त्यांना थोडं बरं वाटेल. अशी आम्हाला आशा आहे"
हे वाचा - कोरोना लशीत तुम्हीही देऊ शकता योगदान; ट्रायलमध्ये सहभागासाठी काय आहेत अटी वाचा
या शोमध्ये जाणारे कजुशिरो हाशिगुची आपला अनुभव शेअर करताना म्हणाला, "कोरोनाव्हायरसमुळे अनेक गोष्टी रद्द झाल्या आहेत. मी तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक मार्ग शोधत होतो. हा शो पाहिल्यानंतर मला खूप बरं वाटतं आहे"
कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना रोजगारदेखील नाही. प्रोडक्शन कंपनी कोवागसेटाइचे कोऑर्डिनेटर केंटा इवानादेखील आपल्या अभिनेत्यांच्या कामाबाबत चिंता वाटत आहे. याआधी ते थीम पार्कसारख्या ठिकाणी प्रदर्शन करायचे. मात्र कोरोनामुळे थीम पार्कही बंद झालेत त्यामुळे या कलाकारांना काम मिळणं बंद झालं आहे. कंपनीने सांगितलं, ग्राहक सध्या नव्या गोष्टींच्या शोधात आहे आणि कोरोनाची भीती दूर करण्याचीही गरज आहे.
हे वाचा - COVID सेंटरमध्येच आरोपीने केली दारु पार्टी, पोलिसांची अब्रू चव्हाट्यावर
इवाना म्हणाले, "शॉपिंग मॉलचे मालक आणि इतर इवेंटचे ऑपरेटर हा हॉरर शो आयोजित करण्यात मदत करतील. आमच्या व्यवसायासाठीदेखील हे चांगलं आहे आणि ग्राहकांनादेखील यातून समाधान मिळत आहे"
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.