मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अरे देवा! भारतातही घुसला Omicron? South Africa हून आलेले 2 प्रवासी Corona positive

अरे देवा! भारतातही घुसला Omicron? South Africa हून आलेले 2 प्रवासी Corona positive

कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट थैमान घालत असलेल्या दक्षिण आफ्रिकेहून (South africa) भारतात आलेल्या दोन प्रवाशांनी उडवली झोप.

कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट थैमान घालत असलेल्या दक्षिण आफ्रिकेहून (South africa) भारतात आलेल्या दोन प्रवाशांनी उडवली झोप.

कोरोनाचा ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंट थैमान घालत असलेल्या दक्षिण आफ्रिकेहून (South africa) भारतात आलेल्या दोन प्रवाशांनी उडवली झोप.

  • Published by:  Priya Lad

बंगळुरू, 27 नोव्हेंबर : डेल्टानंतर आता  B.1.1529 म्हणजे ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सची धास्ती जगाने घेतली आहे (Omicron corona variant). दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचं (South africa Omicron) हे नवं खतरनाक रूप आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेहून भारतात आलेले दोन प्रवासीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे भारतातही आता ओमिक्रॉन घुसला की काय अशी चिंता वाटू लागली.

दक्षिण आफ्रिकेहून भारतात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना टेस्ट केली जाते आहे. कर्नाटकात (Karnataka) दोन प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. बंगळुरूच्या केम्पेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे प्रवासी आढळले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉनचा धोका असलेल्या दहा देशांमधून 584 प्रवासी बंगळुरू विमानतळावर आले. त्यापैकी 94 प्रवासी दक्षिण आफ्रिकेहून आले आहेत. 11 आणि 20 नोव्हेंबरला प्रत्येकी एक अशा दोन प्रवाशांना कोरोना असल्याचं निदान झालं. त्यांना नेमक्या कोणत्या कोरोना व्हेरिएंटची लागण झाली आहे हे तपासण्याची त्यांचे नमुने सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. त्याचा रिपोर्ट आला. त्यात त्यांना डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

हे वाचा - Corona: ओमिक्रॉनने वाढवली चिंता; महाराष्ट्राने मोदी सरकारकडे केली मोठी मागणी

जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organization, WHO) शुक्रवारी घातक कोरोना व्हायरसच्या B.1.1529 या नवीन स्ट्रेनला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' (Variant of concern) म्हणून संबोधलं आणि त्याला ओमिक्रोन (Omicron) असे नाव दिलं. या श्रेणीतील व्हायरस अत्यंत संसर्गजन्य मानले जातात.

दक्षिण आफ्रिकेत 24 नोव्हेंबर 2021 रोजी WHO कडून B.1.1.529 व्हेरिएंटमधील संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. दरम्यान 9 नोव्हेंबर 2021 रोजी टेस्टसाठी आलेल्या सॅपलमध्ये या व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आला.

हे वाचा - CoronaVirus च्या नवीन व्हेरिएंट Omicron वर लस प्रभावी? फायझरनं दिलं उत्तर

WHOचे महासंचालक टेड्रोस अधनम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलं की, नवीन कोविड-19 व्हेरिएंट ओमिक्रोनमध्ये मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन आहेत, त्यापैकी काही चिंताजनक आहेत. त्यामुळे आपल्याला लसीबाबत जागरुक असायला हवे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus