मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /खरा देवमाणूस! कोरोना काळात हा डॉक्टर मोफत करतोय रुग्णांचं उपचार

खरा देवमाणूस! कोरोना काळात हा डॉक्टर मोफत करतोय रुग्णांचं उपचार

 कामाची प्रेरणा (Inspiration) आपल्या आईकडून (Mother) मिळाल्याचं डॉ. अनिल कुमार सांगतात.

कामाची प्रेरणा (Inspiration) आपल्या आईकडून (Mother) मिळाल्याचं डॉ. अनिल कुमार सांगतात.

कामाची प्रेरणा (Inspiration) आपल्या आईकडून (Mother) मिळाल्याचं डॉ. अनिल कुमार सांगतात.

    मुंबई, 14 ऑगस्ट: सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गाच्या साथीने (Corona Pandemic)सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण केलं आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत, उत्पन्न कमी झालं आहे, अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे. त्यातच कोविड-19वर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना लाखो रुपयांच्या खर्चाचा भार सोसावा लागत आहे. अनेक खासगी डॉक्टर परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचं आढळून आलं आहे. याच्या अगदी उलट चित्र रांचीमध्ये (Ranchi) दिसून येत आहे. इथे कोविड-19चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एक डॉक्टर गरजू लोकांना ऑनलाइन (Online) आणि ऑफलाइन (Offline) पद्धतीने मोफत वैद्यकीय सल्ला (Free Medical Service) देत आहेत. डॉक्टर म्हणजे देव असं आपण म्हणतो. या डॉक्टरांनी आपल्या कामाने ते सार्थ करून दाखवलं आहे. डॉ. अनिल कुमार (Dr. Anil Kumar) असं या त्यांचं नाव आहे. 'न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    डॉ. अनिल कुमार 1995मध्ये बिहारमधल्या नालंदा वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी गुजरात सरकारच्या आरोग्य सेवेत काम केलं. त्यानंतर 2001मध्ये ते रांचीला परतले आणि 2005पर्यंत त्यांनी ग्रामीण भागात काम केलं. त्यानंतर रांची इथे त्यांनी आपली खासगी प्रॅक्टिस सुरू केली. तेव्हापासून गरजू रुग्णांना माफक खर्चात किंवा मोफत उपचार देण्याचं तत्त्व त्यांनी पाळलं आहे; पण कोविड-19च्या साथीत त्यांनी आपली मोफत सेवा अधिक नियमित आणि नियोजनबद्ध पद्धतीनं राबवली आहे. आतापर्यंत तीन हजारांहून जास्त रुग्णांना त्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून मोफत उपचार दिले असून, त्यांचं हे काम अव्याहत सुरू आहे.

    देशात कोविड-19चा (Covid-19) प्रादुर्भाव झाला तेव्हा अनेक खासगी डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास तयार नव्हते. अशा वेळी डॉ. अनिल कुमार यांनी ऑनलाइन पद्धतीनं लोकांना उपचारासाठी मोफत सेवा देण्यास सुरुवात केली.

    (हे वाचा: 'लस घेऊनही 18 जणांना डेल्टा प्लसची लागण; ते 5 मृत्यू या व्हेरिएंटमुळे नाही')

    या कामाची प्रेरणा (Inspiration) आपल्या आईकडून (Mother) मिळाल्याचं डॉ. अनिल कुमार सांगतात. या कोरोना संकटाच्या काळात अनेक डॉक्टर्स लोकांच्या असहायतेचा फायदा उठवून प्रचंड पैसे उकळत असल्याचा आरोप करून त्यांच्या आईने नाराजी व्यक्त केली होती. आपल्या मुलाने डॉक्टर होऊन गरीब, गरजू लोकांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि उपचार देऊन मदत करावी, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळं या महासाथीच्या काळात गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी आपला फोन नंबर सोशल मीडियावर शेअर केला आणि लोकांना त्यांच्याशी कधीही संपर्क साधण्याचं आवाहन केलं. ‘सेव्ह लाइफ मिशन’ (Save Life Mission) हा व्हॉट्सअॅप ग्रुप (What’s App) सुरू करून त्याद्वारे मोफत वैद्यकीय सल्ला देण्यास सुरुवात केली. आज व्हॉट्सअॅपद्वारे 500हून अधिक लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत.

    (हे वाचा: लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश, अन्यथा...; पाहा नवे नियम)

    सरकारी रुग्णालयांमधल्या वैद्यकीय सुविधांची वाईट अवस्था पाहता ते आमच्यासाठी देवदूतासारखे (Angle) आहेत. ते कोणाशीही, कधीही संवाद साधण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध असतात, अशी भावना विकी कुमार या रुग्णानं व्यक्त केली आहे. वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास डॉ. अनिल कुमार हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे, असं लाल मुनी महतो यांनी म्हटलं आहे. यावरून डॉ. अनिल कुमार यांची सेवा किती उपयोगाची आणि महत्त्वाची ठरत आहे, याची कल्पना येते.

    First published:

    Tags: Coronavirus, Health