• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं वजन माहिती आहे का? वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचं वजन माहिती आहे का? वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्व कोरोना विषाणूंचे वजन (Coronavirus Weight) किती असेल याबाबत नुकतंच संशोधन पूर्ण झालं आहे.

  • Share this:
मुंबई, 10 जून : संपूर्ण जगात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग पसरला आहे. कोट्यवधी लोक या विषाणूमुळे बाधित झाले आहेत. जर अशा सर्व कोरोना विषाणूंना एकत्रित करून त्याचं वजन (Coronavirus Weight) तपासलं तर ते किती भरेल असा प्रश्न नकळत मनात आल्याशिवाय राहणार नाही. या प्रश्नाचे संशोधकांनी उत्तर दिलं आहे. जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्व कोरोना विषाणूंचे वजन किती असेल याबाबत नुकतंच संशोधन पूर्ण झालं आहे. कोरोना विषाणूंच्या वजनाबाबत इस्त्राईल येथील विजमन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. या संशोधनाचा अहवाल प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) मध्ये 3 जूनला प्रसिद्ध झाला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटले पण फक्त एका सफरचंदाच्या वजनापासून ते नवजात बालकाच्या वजनाइतकंच कोरोनाचं वजन आहे. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या नमुन्याद्वारे ही गणना केली आहे.  कोरोना महासाथीत कालावधी (Pandemic Period) कोणत्याही ठिकाणी एकावेळी 10 लाख ते 1 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. या हिशेबानुसार वैज्ञानिकांनी जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या वजनाची गणना केली आहे. याबाबत विजमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस मधील डिपार्टमेंट ऑफ प्लॉन्ट अँड एनव्हायरमेंटल सायन्सेस विभागातील प्राध्यापक आणि या अभ्यासाचे वरिष्ठ संशोधक रॉन मिलो यांनी सांगितलं की, जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचे वजन 0.1 ते 10 किलोग्रॅमपर्यंत असू शकते. मात्र कमी वजनाचा विषाणू असेल तर तो कमी धोकादायक असतो, असं होऊ शकत नाही. विषाणूच्या अतिसूक्ष्म वजनाविषयी बोलायचं झालं तर कमीत कमी वजन असलेला विषाणू देखील जगभरात धुमाकूळ घालण्यास पुरेसा आहे. सध्या जगभरात 17.3 कोटींहून अधिक लोक कोरोनाबाधित आहेत. तसेच 37 लाखांहून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. विषाणूच्या वजन प्रक्रियेसाठी सुरुवातीला माकडांमध्ये कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा दर तपासला. तोपण अशा वेळी तपासला की ज्यावेळी संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. याचाच अर्थ की शरीरात कोरोना विषाणूचे सर्वाधिक कण अस्तित्वात होते. हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर भारतात आणखी एक जीवघेणा व्हायरस! इथं सापडला पहिला रुग्ण रॉन आणि त्यांच्या पथकाने फुफ्फुसे, टॉन्सिल्स, लिंफ नोड्स आणि पचनसंस्थेतील कोरोनाच्या प्रमाणाचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी कोरोना विषाणू कणांची प्रति ग्रॅम पेशी (Cells) या हिशोबाने गणना केली. त्यानंतर त्याची तुलना मानवी शरीरातील पेशींच्या वजनाशी केली. यातून मानवी शरीरात पसरलेल्या कोरोना विषाणूंच्या कणांचे पूर्ण वजन निश्चित करण्यात आले. यातील कमी वजनाच्या विषाणूंचा अर्थ असा आहे की त्यावेळी संसर्गाचे प्रमाण कमी होते तर 10 किलोग्रॅम वजनाचा अर्थ असा की त्यावेळी जगात कोरोना विषाणू संसर्ग सर्वोच्च पातळीवर होता. मागील गणनेत कोरोना विषाणूच्या व्यासाच्या आधारे एका विषाणू कणाचे वजन 1 फिमॅटोग्राम होते. मानवी शरीरातील प्रत्येक विषाणू कणाच्या वस्तुमानाची गणना करता तो 1 मायक्रोग्रॅम ते 10 मायक्रोग्रॅम होता. हे आकडे वजा करून शास्त्रज्ञांनी जगभरातील सर्व संक्रमित लोकांच्या सरासरी वजनाची गणना केली. यानंतर या डेटा नुसार कोरोना विषाणूचं वजन काढण्यात आलं. रॉन आणि त्यांचे सहकारी सेंडर यांनी सांगितले की आम्ही केवळ एवढंच काम केलं नाही. आमच्या आकड्यांची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही शरीरातील किती पेशी कोरोनाबाधित आहेत याची देखील गणना केली. तसंच प्रत्येक पेशीत किती प्रमाणात विषाणू अस्तित्वात आहे, याच्या पूर्ण संख्येला 1 फिमॅटोग्राम वजनानुसार गुणलं. यामुळे आमची आकडेवारी अधिक स्पष्ट झाली. तसंच यामुळे शरीरात विषाणू किती वेगाने पसरतो (Spread) याची देखील माहिती आम्हाला मिळाली. हे वाचा - कोरोना पॉझिटिव्ह मुलांना देऊ नका हे औषध; केंद्राने सांगितली उपचाराची योग्य पद्धत तसंच रॉन यांच्या पथकाने एक विषाणू एका व्यक्तीच्या शरीरात सरासरी कितीप्रकारे म्युटेशन करू शकतो याबाबतही संशोधन केलं. यासाठी शास्त्रज्ञांनी केवळ न्यूक्लियोटाईड किती वेळी म्युटेट होतो हे पाहिलं. तसंच एक विषाणू मानवी शरीरात किती कॉपीज तयार करतो हे देखील तपासलं. त्यानंतर कॉपीची संख्या आणि न्यूक्लिओटाईड म्युटेटची (Mutate) संख्या यांचा गुणाकार केला. यामुळे विषाणू किती वेळा म्युटेट होता, याबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळाली. या प्रक्रियेवरून रॉन आणि त्यांच्या पथकाला हे कळलं की कोरोनामुळे संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या शरीरात विषाणूचे म्युटेशन (Virus Mutation) 0.1 पासून एकदाच होतं. मात्र ही प्रक्रिया संसर्ग झाल्यापासून 4 ते 5 दिवसांनंतर होते. जर रुग्ण एक महिन्यापेक्षा जास्त काळ आजारी राहत असेल तर त्या एका महिन्यात कोरोना विषाणू शरीरात किमान 3 वेळा म्युटेट होऊ शकतो. यामुळे कोरोनाच्या एवोल्युशन रेटची माहिती मिळते. यासोबतच या शास्त्रज्ञांना मानवी शरीरात कोरोना विषाणूच्या कणामध्ये वैविध्य दिसून आलं. रॉन आणि त्यांच्या पथकाला असं दिसून आलं की एका माणसाच्या शरीरात कोरोना विषाणू 5 ते 6 वेळा बदल घडवून आणतो. याचा अर्थ असा की गंभीर आजारी असलेल्या रुग्णांच्या शरीरात हा बदल लाखो वेळा झालेला असतो. ज्या रुग्णाच्या शरीरात कोरोना विषाणू कणांची संख्या कमी असते, तो व्यक्ती अत्यंत कमी लोकांना संक्रमित करु शकतो किंवा या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग देखील होत नाही, असे रॉन यांनी सांगितलं. हे वाचा - लहान मुलांना कधी मिळणार कोरोना लस? मोदी सरकारने जाहीर केला 'तो' दिवस सुपरस्प्रेडर्सच्या (Super Spreaders) शरीरात कोरोना विषाणू कणांची संख्या अधिक असावी, असे गरजेचे नाही. ही बाब कोरोना व्हेरिएंट, त्याची क्षमता आणि अन्य जैविक घटकांवर अवलंबून असते. अनेकदा कमी विषाणू असलेले रुग्ण देखील सुपरस्प्रेडर्स ठरु शकतात. यामागे सामाजिक कारणे देखील असू शकतात. अशी व्यक्ती किती जणांना भेटते, अशी व्यक्ती मोठ्या सभा किंवा समारंभात सहभागी जातं का. यावरही हे अवलंबून असतं.
Published by:Priya Lad
First published: