• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • अरे बापरे! फंगसनंतर आता गँगरीनचा धोका; कोरोना रुग्णांवर नवं संकट

अरे बापरे! फंगसनंतर आता गँगरीनचा धोका; कोरोना रुग्णांवर नवं संकट

कोरोना रुग्णांच्या फक्त फुफ्फुसांवरच नाही तर आतड्यांवरही गंभीर परिणाम होताना दिसतो आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 जून:  कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) लढा देणाऱ्या रुग्णांमागील संकट काही संपत नाही आहे. कोरोना रुग्णांना नवनवीन आजारांना सामोरं जावं लागतं आहे. फंगसनंतर (Fungus) आता कोरोना रुग्णांना गँगरीनचाही (Gangrene) धोका आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या आतड्यांवरही गंभीर असा दुष्परिणाम होताना दिसतो आहे. कोरोना रुग्णांमध्ये फंगसनंतर आता आणखी एक गंभीर समस्या दिसून आली आहे. ती म्हणजे या रुग्णांच्या आतड्यांमध्ये गुठळ्या  (Intestinal Clots) आणि गँगरीन  होत असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाव्हायरस फुफ्फुसासह गॅस्ट्रोइन्टेस्टेनल ट्रॅक्टवरही हल्ला करू शकतो. दुर्मिळ प्रकरणात कोरोनामुळे रुग्णाच्या आतड्यांमध्ये गुठळ्या होतात. ज्याला वैद्यकीय भाषेत एक्युट मेसेन्ट्रिक इस्कीमिया (AMI)  म्हटलं जातं. हा पोटाचा एक दुर्मिळ आजार आहे. एएमआयमुळे छोट्या आतड्यांना होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो, ज्यामुळे गँगरीनची समस्या उद्भवते. हे वाचा - कोरोनाबाबत दिलासायादायक बातमी, जागतिक आरोग्य संघटनेनं दिली Good News अभ्यासनानुसार 16-30 टक्के कोविड-19 रुग्णांमध्ये गॅस्ट्रोइन्सेस्टेनल लक्षणं दिसून येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मुंबईतील रुग्णालयातील डॉक्टरांनी अशा जवळपास बारा रुग्णांवर उपचार केले आहेत. या रुग्णांना पोटात अचानक तीव्र वेदना जाणवत होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी पोटात अचानक होणाऱ्या वेदनांपासून सावध केलं आहे. तसंच तात्काळ तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. वॅस्क्युलर सर्जन डॉक्टर अनिरुद्ध भुइयां यांनी सांगितलं की, जर यावर वेळीच उपचार नाही झाले तर हा आजार घातक ठरू शकतो. हे वाचा - रामदेव बाबांचा नवा दावा, आता ब्लॅक फंगसवरील आयुर्वेदिक औषध करणार लॉन्च दरम्यान देशात म्युकरमायकोसिसचे 12 हजारपेक्षा जास्त प्रकरणांची नोंद झाली आहे. यापेक्षाही अधिक प्रकरणं असण्याची शक्यता आहे. यावर उपचारासाठी एम्फोटेरेसिन बी औषध दिलं जातं. हे औषध सर्व रुग्णांना उपलब्ध व्हावं, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: