जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / जगात कोरोना व्हायरस कसा पसरला? WHOच्या टीमचा चीनमध्ये कसून तपास सुरू

जगात कोरोना व्हायरस कसा पसरला? WHOच्या टीमचा चीनमध्ये कसून तपास सुरू

corona in china

corona in china

WHO Team in Wuhan Latest Updates: चीनच्या वुहानमधून कोरोना विषाणू जगभर कसा पसरला याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) टीम चीनमध्ये दाखल झाली आहे. या पथकाने वुहानमधील रुग्णालयात भेट दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वुहान, 31 जानेवारी: चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना महामारीमुळे (Corona in Wuhan) संपूर्ण जगाला मोठा फटका बसला. अजूनही अनेक देशांमध्ये कोरोनामुळे नागरिकांचा मृत्यू होत आहे. याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगात कोरोना व्हायरस कसा पसरला याचा शोध सुरु केला आहे. डब्ल्यूएचओची टीम चीनच्या वुहान प्रांतातील त्या रुग्णालयात दाखल झाली आहे ज्याठिकाणी पहिल्या कोरोना रुग्णांवर सर्वात आधी उपचार करण्यात आले होते. वुहानमधील रुग्णालयाला दिली भेट शुक्रवारी डब्ल्यूएचओच्या टीमने वुहानमधील रुग्णालयाला  भेट दिली. याठिकाणी डब्ल्यूएचओची टीम कोरोना विषाणूच्या संबंधित कसून चौकशी करत आहे. चीनच्या म्हणण्यानुसार याठिकाणी एका वर्षापूर्वी कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार करण्यात आले होते. त्यानुसासार डब्ल्यूएचओच्या टीमने त्याच ठिकाणावरुन तपासाला पहिली सुरुवात केली आहे. कोरोना कसा पसरला यावर तपास सुरू जगामध्ये कोरोनाचा प्रसार कसा झाला? याबाबतची माहिती गोळा करण्याचे काम जागतिक आरोग्य संघटनेने हाती घेतले आहे. वुहान प्रांतातील रुग्णालयाला भेट देण्यापूर्वी डब्ल्यूएचओच्या टीममधील काही सदस्यांनी चीनच्या अधिकाऱ्यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली. डब्ल्यूएचओची टीम येत्या काही दिवसांमध्ये वुहान प्रांतातील बऱ्याच ठिकाणांचा दौरा करणार आहे. हॉलंडचे वैज्ञानिक मारियन कूपमान्स यांनी सकाळी ट्विट करत सांगितले की, ‘चीनला आल्यानंतर डब्ल्यूएचओच्या टीमला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा क्वारंटाइचा कालावधी संपला.’ वुहानमध्ये सापडला होता पहिला रुग्ण - चीनने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची लागण झालेल्या पहिल्या रुग्णावर हुबेई प्रॉवेंशियल हॉस्पिटल ऑफ इंटिग्रेटेड चायनीज अँड वेस्टर्न मेडिसिनमध्ये उपचार करण्यात आले होते. याठिकाणी कोविड-19चे पहिले प्रकरण 27 डिसेंबर 2019 ला समोर आले होते.

हे देखील वाचा - पॉझिटिव्ह बातमी! राज्यातल्या या दोन शहरांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

WHO टीम वुहानमधील अनेक ठिकाणचा दौरा करणार - डब्ल्यूएचओने आधी सांगितले होते की, ‘आमच्या टीमने या महामारीच्या संबंधित सविस्तर माहिती मागवली आहे. यामाध्यमातून ते कोरोनाची लागण झालेले पहिले रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांची भेट घेऊ शकतील. डब्ल्यूएचओची टीम वुहान सीफूड मार्केट, वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची प्रयोगशाळा याठिकाणांना भेट देणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात