• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • 72 वर्षांच्या आजोबांना 43 वेळा कोरोनाची लागण, अखेर पत्नीही म्हणाली 'आता मरू दे' अन्..

72 वर्षांच्या आजोबांना 43 वेळा कोरोनाची लागण, अखेर पत्नीही म्हणाली 'आता मरू दे' अन्..

डेव्ह यांची आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) तब्बल 43 वेळा पॉझिटिव्ह आली. एकदा तर ते तब्बल पाच तास सलग खोकत होते. 10 महिन्यांच्या या कालावधीत त्यांना सात वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

  • Share this:
नवी दिल्ली 25 जून: डेव्ह स्मिथ (Dave Smith) या ब्रिटनमधल्या (UK) ब्रिस्टॉल (Bristol) इथल्या 72 वर्षांच्या व्यक्तीने नुकताच शॅम्पेनची बाटली उघडून आनंद व्यक्त केला. हा आनंद क्रिकेट किंवा अन्य कुठल्या खेळात आपल्या देशाची टीम जिंकल्याबद्दलचा नव्हता. तो आनंद होता 290 दिवसांहून अधिक काळ कोरोनाशी (Corona) झुंज देऊन त्याला हरवल्याचा. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या डेव्ह स्मिथ यांचा रिपोर्ट तब्बल 10 महिन्यांनंतर निगेटिव्ह आला. कोविड-19चा सर्वाधिक काळ सक्रीय संसर्ग असलेला रुग्ण असा नकोसा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला. 'बीबीसी टीव्ही'ने डेव्ह स्मिथ यांची मुलाखत घेतली होती. त्या हवाल्याने 'इंडिया टुडे'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या कालावधीत डेव्ह यांची आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) तब्बल 43 वेळा पॉझिटिव्ह आली. एकदा तर ते तब्बल पाच तास सलग खोकत होते. 10 महिन्यांच्या या कालावधीत त्यांना सात वेळा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. आपली पत्नी लिन हिला किमान पाच वेळा तरी आपल्या अंत्ययात्रेची तयारी करावी लागली होती, असं डेव्ह आता हसत हसत सांगतात; पण हे प्रत्यक्ष अनुभवताना मात्र त्यांच्या आरोग्याची स्थिती खूप गंभीर होती. एकदा तर आपण कुटुंबातल्या सगळ्यांना बोलावून घेऊन सगळ्यांचा रीतसर निरोपही घेतला होता, असं ते सांगतात. कोरोनाशी लढा देताना डेव्ह यांचं वजन 117 किलोवरून 64 किलोवर आलं आहे. किती गंभीर लढाईतून डेव्ह जिंकले आहेत, हे कळण्यासाठी हा आकडा पुरेसा आहे. डेल्टा+ व्हेरिएंटचा वाढता धोका, राज्य सरकारकडून निर्बंधासंदर्भातले नवे आदेश जारी त्यांची पत्नी लिन (Lyn) म्हणाली, की अनेकदा आम्हाला वाटलं, की यातून डेव्ह काही तरणार नाहीत. ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर म्हणून सेवानिवृत्त झालेले डेव्ह स्मिथ यांच्यावर अखेर अँटीबॉडी कॉकटेल थेरपी (Antibody Cocktail Therapy) लागू पडली. रिजनरॉन कंपनीने विकसित केलेल्या कॉकटेल ड्रगमध्ये कॅसिरिव्हिमॅब (Casirivimab) आणि इन्डेव्हिमॅब (Indevimab) अशा दोन अँटीबॉडीज असतात. त्या अँटीबॉडीज कोरोना विषाणूच्या स्पाइक प्रोटीनवर (Spike Protein) वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अडकतात आणि नव्या पेशींना त्याचा संसर्ग होण्यापासून रोखतात. याच अँटीबॉडी कॉकटेल थेरपीचा उपयोग अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचारांसाठी करण्यात आला होता. या थेरपीमुळे त्यांचा रिपोर्ट कोविड निगेटिव्ह आला. त्यानंतर शॅम्पेनची बाटली उघडून आनंद व्यक्त करणं अपरिहार्यच होतं. 'डेव्ह आपणहून बरे होण्याची शक्यता फारच कमी होती,' असं त्यांच्यावर उपचार करणारे साउथमीड हॉस्पिटलचे डॉ. एड मोरॉन यांनी सांगितलं. विषाणू शरीरात नेमका कसा आणि कुठे राहतो, कसं वागतो या गोष्टींच्या अभ्यासासाठी डेव्ह यांच्या केसवर शास्त्रज्ञांनीही अभ्यास सुरू केला आहे. त्यात ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
Published by:Kiran Pharate
First published: