मुंबई, 30 मार्च : राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व काही सुरळीत सुरू आहे. पण H3N2 पाठोपाठ आता कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात 694 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 63 टक्के कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्यमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्य आरोग्य विभागाकडून नवीन आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात आज दिवसभरात 694 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. आतापर्यंत राज्यात करोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या ८१,४३,६८६ इतकी झाली आहे. आज दिवसभरात १८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आजपर्यंत एकूण ७९,९२,२२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. सुदैवाने आज राज्यात आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.
(वयासोबत वाढते महिलांचे वजन! फक्त हार्मोनल चेंजेस नाही या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण)
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची 3,016 संख्या आहे. 27ऑक्टोबरला 972 प्रकरण समोर आली होती. हीच सर्वात मोठी आकडेवारी होती. पण आता चार आठवड्यांपूर्वी राज्यात कोरोना रुग्णांचा सकारात्मक दर 1.05 टक्के होता. पण 22 ते 28 मार्चदरम्यान कोरोना रुग्णांचा दर हा 6.15 टक्के वाढला आहे.
(पुरुषांपेक्षा स्त्रिया जगतात जास्त आणि कमी प्रमाणात पडतात आजारी, असे का? हार्वर्डने शोधलं उत्तर)
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 3,016 नवीन कोरोना रुग्णांची संख्या समोर आली आहे. एकाच दिवसात ही मोठी वाढ आहे. जवळपास मागील सहा महिन्यात सर्वाधिक आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली असून 13,509 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे मृतांची संख्या ही 530862 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 220,65,92,481 लोकांना कोरोना लस दिली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.