जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वयासोबत वाढते महिलांचे वजन! फक्त हार्मोनल चेंजेस नाही या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

वयासोबत वाढते महिलांचे वजन! फक्त हार्मोनल चेंजेस नाही या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

वयासोबत वाढते महिलांचे वजन! फक्त हार्मोनल चेंजेस नाही या गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकजण काही काळानंतर निरोगी वजन राखण्यासाठी धडपडत असतो. विशेषतः महिलांचे वजन त्यांच्या वयासोबत वाढत जाते. वजन कमी करण्याचे अनेक मार्ग असले तरी महिलांना हा प्रश्न नेहमी सतावतो की, आपले वजन का वाढत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 मार्च : वजन व्यवस्थापन हे सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. स्त्री असो वा पुरुष असो, प्रत्येकजण काही काळानंतर निरोगी वजन राखण्यासाठी धडपडत असतो. विशेषतः महिलांचे वजन त्यांच्या वयासोबत वाढत जाते. वजन कमी करण्याचे अनेक मार्ग असले तरी महिलांना हा प्रश्न नेहमी सतावतो की, आपले वजन का वाढत आहे. आपण निरोगी अन्न खातो, व्यायाम करतो आणि चांगली जीवनशैली जगतो. तरीही वजन वाढत आहे. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. महिलांचे शरीर जटिल आहे. काळाच्या ओघात ते अनेक बदलांमधून जातात. तरुणपणानंतर हार्मोनल बदल आणि मासिक पाळी वजन वाढण्यास कारणीभूत ठरते आणि गर्भधारणेनंतर इतर अनेक घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मात्र वजन वाढण्याची आणखीही काही कारणं असू शकतात. चला जाणून घेऊया कोणती. पुरुषांपेक्षा स्त्रिया जगतात जास्त आणि कमी प्रमाणात पडतात आजारी, असे का? हार्वर्डने शोधलं उत्तर वजन वाढण्याची कारणं - एबीपी माझा मध्ये दिलेल्या माहितीनुसार, तुमचे अचानक वजन वाढत असेल तर हे एखाद्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. PCOD किंवा PCOS च्या समस्येमुळे महिलांचे वजन वाढू लागते. याशिवाय थायरॉईड, नैराश्य, चिंता किंवा आतड्यांसंबंधी समस्यांमुळे महिलांचे वजन वाढू शकते.

News18लोकमत
News18लोकमत

- अनेक महिला घरातूनच काम करणं सोयीचं मानतात. कारण त्यामुळे त्यांना घरातील कामं आणि माणसं सांभाळून ऑफिसचं कामही करता येतं. परंतु खूप काळ एका जागी बसून डेस्क जॉब केल्याने वजन वाढत जाते. किंवा जास्त काळ बसून टीव्ही पाहणे, फोनवर बोलणे, झोपणे यामुळेही लठ्ठपणा वाढतो. - नोकरी करणाऱ्या महिलांवर ऑफिसच्या कामासोबतच घराचीही खूप जबाबदारी वाढते. पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त काम करतात. अशावेळी कामाच्या टेन्शनमध्ये महिलांना बऱ्याचदा झोप लागत नाही आणि झोप कमी झाली की महिलांचे वजन झपाट्याने वाढू लागते. तुम्ही इतके तास झोप घेत नसाल तर व्हा सावध, संपूर्ण शरीराच्या धमन्या होऊ शकतात ब्लॉक - बऱ्याचदा महिला कामाच्या नादात त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आहारातून मिळणाऱ्या काही पोषक तत्त्वांच्या कमतरतेसह काही वेळा महिलांना पाण्याचीदेखील कमतरता होऊ शकते. डिहायड्रेशन हे देखील वजन वाढण्याचे कारण असू शकते. यामुळे महिलांना थकवा येतो आणि सारखी भूक लागते. यामुळे वजन वाढते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात