• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • भयंकर! मतदान करण्यासाठी म्हणून गावी पोहोचला, कोरोनामुळे स्वत:सह आणखी 5 जणांचा मृत्यू

भयंकर! मतदान करण्यासाठी म्हणून गावी पोहोचला, कोरोनामुळे स्वत:सह आणखी 5 जणांचा मृत्यू

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला (Second Wave of Coronavirus) थोपवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. मात्र काही जणांच्या निष्काळजीपणामुळे ते केवळ स्वत:चा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत.

 • Share this:
  लखनऊ, 05 मे: संपूर्ण देश आज कोरोनाशी (Coronavirus in India) दोन हात करत आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला (Second Wave of Coronavirus) थोपवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. अनेक ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) देखील लागू करण्यात आला आहे. मात्र काही जणांच्या निष्काळजीपणामुळे ते केवळ स्वत:चा नाही तर इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये देखील अशीच काहीशी घटना घडली आहे. बीसलपूर याठिकाणी असणाऱ्या वौनी गावात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आरोग्य अधिकारी जेव्हा गावात याबाबत विचारण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना गावकऱ्यांकडून वारंवार परत जाण्यास सांगितलं जात होतं. जेव्हा त्यांनी घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा समोर आलेलं सत्य धक्कादायक होतं. नेमकं काय घडलं? एशियानेट न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. या मीडिया अहवालानुसार एसडीएम राकेश कुमार गुप्ता यांनी अशी माहिती दिली होती की, सार्वजनिक आरोग्य केंद्राचे अधिक्षक डॉक्टर ठाकुरदास यांना त्यांनी गावाचा दौरा करण्यास पाठवलं होतं. गावात झालेल्या मृत्यूंविषयी चौकशी करण्यासाठी आणि त्यामागील कारण शोधून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. गावातील एका व्यक्तीने त्यावेळी माहिती दिली की पंचायत निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला. अत्यसंस्कारानंतर गावातील तीन ज्येष्ठ महिलांसह पाच जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. ही माहिती मिळताच आरोग्य अधिकारी गावात पोहोचले होते. हे वाचा-कोरोना काळात मोठा दिलासा! इमरजन्सी हेल्थ सेवांसाठी RBI ने दिले 50,000 कोटी मात्र अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह असतील या भीतीपोटी गावकऱ्यांनी त्यांना गावात येऊ दिलं नाही. त्यामुळे मृतांचं शवविच्छेदन देखील केलं गेलं नाही. यामुळे त्यांचा मृत्यू कशामुळे झाला यामागचं कारणही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मतदान करण्यासाठी आलेल्या त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोव्हिड पॉझिटिव्ह होऊन इतरांचाही मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: