Home /News /coronavirus-latest-news /

कोरोना पॉझिटिव्ह असूनही विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, या देशातील धक्कादायक प्रकार

कोरोना पॉझिटिव्ह असूनही विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, या देशातील धक्कादायक प्रकार

जगभरात कोरोनाचं (Corornavirus) संकट पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये 35 कोरोना संक्रमित (COVID-19) विद्यार्थ्यांसह लाखो महाविद्दयालयीन विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली.

    नवी दिल्ली, 04 डिसेंबर: जगभरात कोरोनाचं (Corornavirus) संकट पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये 35 कोरोना संक्रमित (COVID-19) विद्यार्थ्यांसह लाखो महाविद्दयालयीन विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली. दक्षिण कोरियाच्या शिक्षण मंत्रालायाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात 1380 परीक्षा केंद्रावर जवळपास 4,93,430 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून यामध्ये 35 कोरोना संक्रमित आणि आयसोलेशन मध्ये राहत असलेल्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. सोशल डिस्टंन्सिंगचे नियम कडक ही वार्षिक परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येणार होती परंतु कोरोनाच्या जागतिक संकटामुळे ती उशिरा झाली. दरम्यान, गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे 540 नवीन रुग्ण आढळले. देशातील वाढती प्रकरणं लक्षात घेता सोशल डिस्टंन्सिंगचे (social distancing) नियम पुन्हा एकदा कडक करण्यात आले आहेत. भारतात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 95 लाखांच्या पार भारतात कोरोनाचे (Corona) संक्रमण आधीपेक्षा कमी वेगाने होत आहे, असे असले तरीही कोरोना रुग्णांचा आकडा 95 लाखांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 89 लाख 73 हजार 373 नागरिक कोरोनातून बाहेर आले आहेत. तर सध्या देशात 4 लाख 22 हजार 943 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. भारतातही शाळा, प्रवेश परीक्षा कोरोनामुळे लांबणीवर टाकल्या गेल्या. पण मल्टिपल चॉइस क्वेश्चन (MCQ) तसंच ऑनलाइन पद्धत वापरून हळूहळू परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याची काळजी सरकार घेत आहे आणि विद्यार्थीही जोमाने अभ्यास करत आहेत. त्यांच भवितव्य या परीक्षांवर अवलंबून आहे. (हे  वाचा-कोरोनाच्या लशीचे मोठे दुष्परिणाम दिसल्यास ब्रिटन देणार नुकसान भरपाई) भारतात देखील पुन्हा एकदा कोरोना लाट येण्याची संकट वर्तवण्यात येत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर कोरोना लसीची देखील वाट पहिली असून कोणत्या कंपनीची लस सर्वात पहिली बाजारात येते याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागून आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, South korea

    पुढील बातम्या