कोरोनाच्या लशीचे मोठे दुष्परिणाम दिसल्यास ब्रिटन देणार नुकसान भरपाई

कोरोनाच्या लशीचे मोठे दुष्परिणाम दिसल्यास ब्रिटन देणार नुकसान भरपाई

ब्रिटनमधील नागरिकांना ही लस देण्यात आल्यानंतर जर मोठे दुष्परिणाम आढळून आले तर त्याची नुकसान भरपाई ब्रिटन सरकारकडून केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : पुढच्या आठवड्यात ब्रिटनमध्ये नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आता ब्रिटननं आणखीन एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाची लस नागरिकांना दिल्यानंतर जर कोणताही मोठा दुष्परिणाम आढळून आला तर त्या नागरिकांना ब्रिटन नुकसान भरपाई देणार आहे.

कोरोना विषाणूच्या लसीच्या दुष्परिणामांमुळे पीडित लोकांना ब्रिटन नुकसान भरपाई करणार आहे. ब्रिटनच्या सरकारने फायझर आणि बायोनोटेकच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. ब्रिटन प्रथमच आपल्या नागरिकांना कोरोना लस देणार आहे.

हे वाचा-कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ, मृत्यूचा आकडा वाढला

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची लस नागरिकांना देण्यात येणार आहे. कोरोनाची लस नागरिकांना देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं आहे.

भारतात मानवी चाचणीदरम्यान सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या लशीचे दुष्परिणाम झाल्याचा दावा एका 40 वर्षीय तरुणानं करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. मात्र सीरमनं या संदर्भात परिपत्रक काढून या व्यक्तीनं केलेले दावे खोटे असल्याचं सांगत त्याच्यावर 100 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करण्यात आला आहे.

ब्रिटनमधील नागरिकांना ही लस देण्यात आल्यानंतर जर मोठे दुष्परिणाम आढळून आले तर त्याची नुकसान भरपाई ब्रिटन सरकारकडून केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 4, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या