लखनऊ 15 मे : कोरोना (Coronavirus) महामारीच्या काळात संपूर्ण देशभरातून दुःखद आणि चिंतेत भर घालणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, वाराणसीमधून एक सकारात्मक व्हिडिओ (Positive Video) समोर आला आहे. लोकांच्या हा व्हिडिओ पसंतीसही पडत आहे. ब्लड कॅन्सर (Blood Cancer) असलेल्या एका तीन वर्षाच्या बाळानं कोरोनावर मात केली आहे. डॉक्टरांनी पीपीई कीट (PPE Kit) घालून कोरोना वार्डात डान्स करत त्याला आणखी हिंमत देण्याचं काम केलं. ही घटना वाराणसीच्या लहरतारा परिसरातील होमी भाभा कॅन्सर रुग्णालयातील आहे.
अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे 2 जणांचा मृत्यू, 8 जणांना लागण
देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांमधील हलगर्जीपणाच्या बातम्या अनेकदा समोर येत असतात. उत्तर प्रदेशातही अनेक मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मात्र, या कठीण परिस्थितीमध्येही होमी भाभा कॅन्सर रुग्णालयात भर्ती असणाऱ्या तीन वर्षाच्या मुलानं कोरोनावर मात केली आहे. कोरोनासोबतच ब्लड कॅन्सर असणारा हा मुलगा रुग्णालयात दाखल झाला तेव्हा त्याला वाचवणं शक्य होईल ही आशा खूप कमी होती.
Success Story: शाळेतून काढून टाकलेला पोरगा IPS झाला
रुग्णालयातील इतर रुग्णदेखील या मुलाला पाहून हैराण होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या या चिमुकल्यानं कोरोनाला हरवलं. या मुलाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टर आणि नर्सलाही प्रचंड आनंद झाला आणि हे सगळे कोरोना वार्डात जाऊन डान्स करू लागले आणि मुलाच्या आनंदात सहभागी झाले. कोरोना वार्डातच पीपीई किट घालून डॉक्टर आणि नर्स थिरकताना दिसले. यावेळी हा तीन वर्षाच्या मुलगा आणि तिथे असणारे इतर रुग्ण टाळ्या वाजवताना दिसले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Corona patient, Positive story