नवी दिल्ली 10 जानेवारी : कोरोनाचं (Coronavirus Updates) एक-एक नवीन रूप समोर येत असल्याने या महामारीबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जगभरात प्रसार होत असतानाच सायप्रसच्या एका शास्त्रज्ञामे आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा (New Strain of Coronavirus) शोध लावला आहे. हा नवा स्ट्रेन कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचं (Omicron Variant) मिश्रण असल्याचं म्हटलं जात आहे. याला डेल्टाक्रॉन (Deltacron) नाव दिलं गेलं आहे.
आजपासून संपूर्ण देशभरात दिला जाणार लशीचा बूस्टर डोस; जाणून घ्या महत्त्वाचे नियम
ओमयक्रॉन आतापर्यंत सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचं सांगितलं जात आहे. तर डेल्टा व्हेरिएंटने मागील वर्षी देशातील अनेक भागात अक्षरशः हाहाकार माजवला होता. अशात आता या दोन्ही व्हेरिएंटच्या मिश्रणातून तयार झालेला व्हेरिएंट किती घातक असू शकतो, याचा अंदाज लावता येईल. सायप्रसच्या संशोधकांनी याच आठवड्यात आपले निष्कर्ष GISAID ला पाठवले. GISAID एक आंतरराष्ट्रीय डेटाबेस आहे, जे व्हायरसला ट्रॅक करतात.
आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायप्रसला डेल्टाक्रॉनची आतापर्यंत 25 प्रकरणं आढळली आहेत. मात्र, कोणत्याही देशाने आतापर्यंत याची पुष्टी केलेली नाही. डेल्टाक्रॉनबद्दल काही व्हायरोलॉजिस्टचं म्हणणं आहे की हा एखादा नवा व्हेरिएंट नाही. याला व्हायरसच्या फायलोजेनेटिक ट्रीवर ट्रेस किंवा प्लॉट करता येणार नाही.
कोरोनामुक्त झालेल्या 92 पैकी 56 विद्यार्थिंनींना Omicronची लागण, सांगलीत खळबळ
सध्या भारतासह संपूर्ण जग ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सामना करत आहे. भारतात रविवारी कोरोनाची नवीन 1,59,632 प्रकरणं समोर आली आहेत. आरोग्य विशेषतज्ञांच्या मते, येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाची 2 लाखाहून अधिक प्रकरणं समोर येऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Coronavirus