Big news : पाकिस्तानात गेले अन् कोरोना घेऊन आले, 100 भाविकांना लागण

Big news : पाकिस्तानात गेले अन् कोरोना घेऊन आले, 100 भाविकांना लागण

सीमेवर या सर्वांची कोविड चाचणी केली जात आहे. त्यात आतापर्यंत 100 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  • Share this:

अमृतसर, 22 एप्रिल : बैसाखी उत्सवाच्या निमित्ताने पाकिस्तानात (Pakistan) गेलेल्या 818 शीख भाविकांपैकी 100 भाविकांना कोरोनाची लागण (100 pilgrims tested Covid positive) झाली आहे. या भाविकांचा गट भारतात परतायला सुरुवात झाली आहे. सीमेवर या सर्वांची कोविड चाचणी केली जात आहे. त्यात आतापर्यंत 100 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानातून या उत्सावरून परतणाऱ्या भाविकांची अट्टारी-वाघा सीमेवर अँटिजेन (RAT)चाचणी केली जात आहे. जवळपास 300 जणांची चाचणी झाल्यानंतर त्यातील सुमारे 100 जण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. 818 भाविक याठिकाणी गेले होते. त्यामुळं आणखी चाचण्यांमधून हा आकडा आणखी वाढू शकतो. ज्यांची चाचणी झाली आहे केवळ त्यांनाच जाण्याची परवागी दिली जात आहे. तर ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली त्यांना निरगाणीखाली ठेवलं जात आहे. या सर्वांना कोविड सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवणार की होम क्वारंटाईन करणार हे मात्र अद्याप ठरलेलं नाही.

(वाचा-मेडिकल व्हिसावर भारतात आला प्रोफेसर आणि सुरू केला ड्रग्जचा धंदा; NCB कडून कारवाई)

बैसाखी उत्सवाच्या निमित्ताने 12 एप्रिल रोजी शीख भाविक पाकिस्तानात सोहळ्यासाठी गेले होते. जाण्यापूर्वी या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात निगेटिव्ह असलेल्या भाविकांनाच जाण्याची परवानगी देण्यात आली. या सर्वांना पाकिस्तानकडून 10 दिवसांचा व्हिसा देण्यात आला होता. या दरम्यान 14 एप्रिल रोजी हसन अब्दाल येथील गुरुद्वारा पंजाब साहीबमधील मुख्य सोहळ्यासह आसपासच्या गुरुद्वारांना या भाविकांनी भेटी दिल्या. करतारपूर येथील गुरुद्वारा दरबारसाहीबलादेखिल भाविकांनी भेट दिली.

(वाचा-...म्हणून पुण्यातील कोविड रुग्णालयात नव्या रुग्णभरतीला बसला खीळ)

पाकिस्ताननं कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसंच स्थानिक पंजाबी नागरिकांना सोहळ्यात सहभागी न होण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तसंच भारतातून गेलेल्या भाविकांनाही गुरुद्वारा परिसर न सोडण्याच्या सूचना होत्या. तरीही अनेक शीख बांधव हे लाहोरमधील रस्त्यांवर फिरताना आणि खरेदी करताना आढळून आल्याचं समोर आलं होतं.

पाकिस्तानात कोरोनाचा संसर्ग अगदी वेगानं पसरत आहे. तर पंजाबमध्येही आता संख्या वाढत असून रोज 4000 पेक्षा अधिक रुग्ण राज्यात सापडत आहेत. त्यात आता पंजाबहून आलल्या भाविकांच्या संख्येमुळं आणखी भर पडणार आहे. सीमेवरच चाचणी होत असल्यानं त्यांच्याकडून संसर्गाचा धोका मात्र कमी होईल. पण तरीही या सर्वांनी काळजी घेऊन विलगीकरण पूर्ण करणं गरजेचं आहे.

Published by: News18 Desk
First published: April 22, 2021, 8:27 PM IST

ताज्या बातम्या