मेडिकल व्हिसावर भारतात आला प्रोफेसर आणि सुरू केला ड्रग्जचा धंदा; NCB कडून कारवाई

मेडिकल व्हिसावर भारतात आला प्रोफेसर आणि सुरू केला ड्रग्जचा धंदा; NCB कडून कारवाई

ओलिव्हर हा दुबईत बायोलॉजीचा प्राध्यापक असून तो काही दिवसांपूर्वीच भारतात मेडिकल व्हिसावर आला होता. त्याला हेपॅटायटिस बी हा आजार होता आणि त्याच्या उपचारासाठी तो मुंबईत आला होता.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई युनिटनं मुंबईच्या अंधेरी परिसरातून एका बायोलॉजीच्या प्रोफेसरला अटक केली आहे. हा प्रोफेसर एमडीएमएच्या एक्सटीसी पिल्सचा धंदा करत होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव दीबा ओलिव्हर आहे. तो कॅमरूनचा नागरिक असून तो स्वतःकडे ड्रग्ज ठेवत नव्हता तर ऑर्डरनुसार मागवून द्यायचा. यातून मिळणाऱ्या कमिशनवर तो जगत होता.

(वाचा-सरकारचा इशारा! तुम्हालाही हा SMS आला असल्यास, लगेच करा डिलीट,बसू शकतो मोठा फटका)

ओलिव्हर हा दुबईत बायोलॉजीचा प्राध्यापक असून तो काही दिवसांपूर्वीच भारतात मेडिकल व्हिसावर आला होता. त्याला हेपॅटायटिस बी हा आजार होता आणि त्याच्या उपचारासाठी तो मुंबईत आला होता. उपचारादरम्यान त्याला मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज उद्भवली आणि त्यातून एकाने त्याची ड्रग पेडलरबरोबर भेट घालून दिली. त्यानंतर पैशांसाठी तो ड्रग्जचा धंदा करू लागला. प्राध्यापक असल्याने तो अत्यंत व्यवस्थितपणे लोकांशी बोलत होता. त्याच्या घरावर छापा मारल्यानंतर 20 एमडीएमएच्या एक्सटीसी पिल्स जप्त केल्या आहेत. तो ऑर्डर मिळाल्यानंतर मोठ्या पेडलरकडून ड्रग्ज मागवत होता आणि नंतर टॅक्सी किंवा रिक्षाने जाऊन डिलिव्हरी देत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

(वाचा-Oxygen तुटवडा दूर करण्यासाठी मोदींनी घेतली महत्त्वाची बैठक, सांगितले 'हे' 3 उपाय)

या प्रोफेसरला पकडण्याबरोबरच एनसीबीनं अग्रिपाडा परिसरात देखिल एका इमारतीत छापा मारून मोहम्मद इमरान अन्सारी नावाच्या ड्रग पेडलरला अटक केली होती. पोलिसांनी नुकतीच सरफराज कुरेशी उर्फ पप्पी याला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे समीर सुलेमान सामा या ड्रग पेडलरचं नाव समोर आलं. समीरच्या घरीही पोलिसांनी छापा मारला तेव्हा 56 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि जवळपास 18 लाख रोख जप्त केली होती. त्याच्या चौकशीमध्ये इमरान अन्सारीचं नाव समोर आलं, त्यानुसार कारवाई करत त्याला अटक केली.

एनसीबीचं पथक समीरच्या घरी गेलं तेव्हा लवकरच दरवाजा उघडला नाही. तसंच घरातील ड्रग्ज हे त्यानं खिडकीतून खाली फेकून दिलं. ही इमारत चार मजली होती. पथकाला त्यानं ड्रग्ज खाली फेकल्याचं लक्षात आलं. त्यानंतर अधिकारी पाईपमार्गे शोधत खाली आले तेव्हा लाखो रुपयांचं हे ड्रग्ज एका कोपऱ्यात अडकलेलं सापडलं होतं. एकूणच एनसीबीला एकापाठोपाठ एक ड्रग्ज पेडलरकडून आणकी लिंक मिळत असल्यानं या प्रकरणात आरोपींची संख्या वाढत चालली आहे. तसंच ड्रग्जचा हा गोरखधंदा बंद करण्यासाठी यंत्रणेला मोठी मदत मिळत आहे.

Published by: News18 Desk
First published: April 22, 2021, 7:05 PM IST

ताज्या बातम्या