सांगली,13 ऑक्टोबर: जिल्हा परिषद सांगली
(District Council Sangli) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(ZP Sangli Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती
(Jobs in sangli) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 11
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसाच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
MBBS उमेदवार प्राप्त न झाल्यास BAMS पर्यंत शिक्षण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
हे वाचा-
MPSC Recruitment: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग इथे तब्बल 80 पदांसाठी मोठी भरती
इतका मिळणार पगार
MBBS पदवीधारकांना आदिवासी भागांमध्ये काम करण्यासाठी 80,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.
तसंच इतर भागांसाठी MBBS पदवीधारकांना 75,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.
विशेषतज्ज्ञांना आदिवासी भागांमध्ये काम करण्यासाठी 90,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.
तसंच इतर भागांसाठी विशेषतज्ज्ञांना 85,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.
काही महत्त्वाच्या सूचना
ही पदभरती तात्पुरत्या स्वररूपाची असून कंत्राटी तत्वावर असणार आहे.
अकरा महिन्यांच्या कंत्राटावर पदभरती केली जाणार आहे.

ZP Sangli Recruitment 2021
मुलाखतीला येताना ही कागदपत्रं आवश्यक
MBBS किंवा BAMS च्या सर्व सेमिस्टर्सच्या गुणपत्रिका
अनुभव प्रमाणपत्र
जातीचा दाखला
वयाचा दाखला
अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो
ओळखपत्र
हे वाचा-
Yavatmal Job Alert: जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे 'या' पदांसाठी भरती
अर्ज पाठवण्याचा पत्ता
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 18 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | ZP Sangli Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 11 |
शैक्षणिक पात्रता | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | MBBS पदवीधारकांना आदिवासी भागांमध्ये काम करण्यासाठी 80,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.
तसंच इतर भागांसाठी MBBS पदवीधारकांना 75,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.
विशेषतज्ज्ञांना आदिवासी भागांमध्ये काम करण्यासाठी 90,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल.
तसंच इतर भागांसाठी विशेषतज्ज्ञांना 85,000 रुपये प्रतिमहिना पगार दिला जाईल. |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://sangli.nic.in/या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.