Home /News /career /

Yavatmal Job Alert: जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे 'या' पदांसाठी भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

Yavatmal Job Alert: जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ इथे 'या' पदांसाठी भरती; या पत्त्यावर पाठवा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  यवतमाळ, 12 ऑक्टोबर: जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ (Collector Office Yavatmal Recruitment) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Collector Office Yavatmal Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  तक्रार निवारण प्राधिकारी या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    तक्रार निवारण प्राधिकारी  (Ombudsperson) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तक्रार निवारण प्राधिकारी  (Ombudsperson) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवार यांना समाज कार्य, शैक्षणिक किंवा समाज क्षेत्रातील कामाचा किमान वीस वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार हे भारताचे नागरिक असावेत. उमेदवार हे कोणत्यही राजकीय पक्षासोबत निगडित नसावेत. हे वाचा- 2021 संपेपर्यंत तब्बल 10 लाख IT कर्मचारी सोडणार जॉब्स? Attrition Rate मध्ये वाढ कालावधी आणि मानधन हे पदभरती दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. उमेदवारांची कामगिरी समाधानकारक नसल्यास ही नियुक्ती रद्द करण्यात येईल. उमेदवारांना कमाल मानधन 20,000/- रुपये प्रतिमहिना देण्यात येईल. ही असेल जबाबदारी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सामान्य जनतेच्या तक्रारींचं निवारण करणे. तसंच कामात पारदर्शकता राखून ठेवण्यासाठी उपाय सुचवणे. अर्ज पाठवण्याचा पत्ता उपजिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ हे वाचा- Thane Job Alert: सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरी अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 ऑक्टोबर 2021
  JOB ALERTCollector Office Yavatmal Recruitment 2021
  या पदांसाठी भरती   तक्रार निवारण प्राधिकारी  (Ombudsperson)
  शैक्षणिक पात्रता तक्रार निवारण प्राधिकारी  (Ombudsperson) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवार यांना समाज कार्य, शैक्षणिक किंवा समाज क्षेत्रातील कामाचा किमान वीस वर्षांचा अनुभव असावा. उमेदवार हे भारताचे नागरिक असावेत. उमेदवार हे कोणत्यही राजकीय पक्षासोबत निगडित नसावेत.
  कालावधी आणि मानधनउमेदवारांना कमाल मानधन 20,000/- रुपये प्रतिमहिना देण्यात येईल.
  अर्ज पाठवण्याचा पत्ताउपजिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://yavatmal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs

  पुढील बातम्या